Anmol Bishnoi arrested  Saam tv
देश विदेश

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Anmol Bishnoi arrested in US : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.

Pramod Subhash Jagtap

मुंबई : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे. या प्रकरणाचा प्रमुख आरोपी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला अमेरिकेत ताब्यात घेण्यात आलं आहे. मागील महिन्यात भारत सरकारने अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. या प्रकरणी केंद्रीय गृह विभाग किंवा एनआयए अधिकृत माहिती देण्याची शक्यता आहे.

अमेरिकेतील कॅलिफॉर्नियामध्ये अनमोलला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला सोपवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अनमोल बिश्नोई याच्यावर राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धिकी हत्याकांड आणि अभिनेता सलमान खानच्या बांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अनमोल फरार आहे.

अनमोल बिश्नोईवर राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) द्वारे अनेक दोन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तसेच त्याच्यावर इतर १८ गुन्हा देखील नोंद आहेत. काही दिवसांपूर्वी एनआयएने अनमोल बिश्नोईला अटक करण्यास मदत करणाऱ्या व्यक्तीला १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्याची घोषणा केली होती.

'एनआयए'ने लोकांना अनमोल बिश्नोईच्या लपण्याचा ठिकाणाविषयी अनेक माहिती देण्याची विनंती केली होती. मात्र, अनमोल पोलिसांच्या तावडीत सापडत नव्हता. तो गुन्हेगारीच्या नेटवर्कमध्ये सक्रिय राहायचा. यामुळे भारताचा मोस्ट वॉन्टेंडपैकी एक आहे. त्याची दिवसेंदिवस गुन्हेगाारी वाढू लागली होती.

अनमोल बिश्नोईने गुन्हे जगतात त्याच्या भाऊ लॉरेन्सच्या मदतीने एन्ट्री मारली. अनमोलला ७ ऑक्टोबर २०२१ रोजी जामीन मिळाला. त्यानंतर २०२३ साली त्याच्या विरोधात चार्जशीट दाखल झाली होती. मात्र, अनमोल बोगस पासपोर्टाच्या सहाय्याने भारतातून पलायन केलं होतं. अनमोल बिश्नोई हा त्याचे राहण्याचे ठिकाण सतत बदलायचा. मागील वर्षी तो केनियामध्ये होता. तर या वर्षी कॅनडामध्ये होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Labour Code : सुट्टी घेतलीच नाही? आता मिळणार पैसे, नवीन कर्मचारी कायदाचा फायदाच फायदा, वाचा

प्राजक्त तनपुरेंची पोटनिवडणुकीतून माघार, भाजपचं 'ऑपरेशन राहुरी' ग़ंडलं

सांगलीमधील बड्या नेत्याचा २०२९मध्ये करेक्ट कार्यक्रम होणार; भाजप नेत्याच्या इशाऱ्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

Tuesday Horoscope: मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल, ५ राशींना पैशांची चणचण भासेल, वाचा आजचे राशीभविष्य

महिलांकडून भोंदूबाबांना गावबंदी, खरात प्रकरणानंतर महिलांची मोहीम

SCROLL FOR NEXT