Ram Mandir Darshan Time Saam Tv
देश विदेश

Ram Mandir Darshan Time: अयोध्येच्या राम मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, ट्रस्टने जाहीर केली आरती आणि दर्शनाची वेळ

Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरामधील श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर आता दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत.

Satish Kengar

Ram Mandir Darshan Time:

अयोध्येतील राम मंदिरामधील श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर आता दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. श्रीरामाच्या दर्शनासाठी भाविकही मोठ्या संख्येने रामनगरीत पोहोचत आहेत. आतापर्यंत श्रीरामाच्या दर्शन आणि आरतीची कोणतीही निश्चित वेळ नव्हती. मात्र भाविकांची प्रचंड गर्दी पाहता श्री रामजन्मभूमी ट्रस्टने आरती आणि दर्शनाची वेळ यादी जाहीर केली आहे.

विश्व हिंदू परिषदेचे मीडिया प्रभारी शरद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे साडेचार वाजता श्रीरामाची आरती होणार आहे. श्रृंगार आरती सकाळी 6.30 वाजता होईल. सकाळी सातपासूनच भाविकांना श्रीरामाचे दर्शन घेता येणार आहे. दुपारी 12 वाजता भोग आरती आणि सायंकाळी 7.30 वाजता संध्या आरती होईल. रात्री 9 वाजता जेवण आणि रात्री 10 वाजता शयन आरती होईल.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी रामभक्तांचा मार्गही आता सुकर झाला आहे. रामदर्शनासाठी राम मंदिराजवळ वाहतूकही पूर्ववत आली आहेत. भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवल्यानंतर वाहतूक पोलिसांनी उदय चौक आणि साकेत पेट्रोल पंपावरून वाहतूक सुरळीत केली आहे. ई-बसशिवाय ई-रिक्षाही सुरू झाल्या आहेत.  (Latest Marathi News)

पोलीस उपअधीक्षक एपी सिंह यांचा हवाला देत पीआरओ दिलीप कुमार दुबे यांनी सांगितले की, अयोध्येतील गर्दी नियंत्रणात आहे. जिल्ह्यांच्या सीमेवरील वाहतूक पूर्ववत होईल. अयोध्येच्या एंट्री पॉईंट साकेत पेट्रोल पंपापासून लता चौकापर्यंत आणि उदया चौकाहून तेधी बाजारापर्यंत ई-रिक्षा आणि ई-बस धावू लागल्या आहेत.

ते म्हणाले की, शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या लोकांना मंदिराजवळ जाण्याची सुविधा दिली जात आहे. ते म्हणाले की, विमानतळ, रेल्वे स्थानक आणि बसस्थानकावर वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले असून ते भाविकांना मदत करतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आयुष्य संपवलं; माहेरच्या लोकांकडून घरासमोर पार्थिवावर अंत्यविधी

Soham Bandekar Marriage: लाडक्या आदेश भाऊजींच्या घरी लगीनघाई! होणारी सुनबाई आहे तरी कोण?

Nagpur Politics : ठाकरेंना मोठा झटका, १२ वर्षे शिवसेनेत काम केलेल्या तरूण नेत्याचा राजीनामा, २ कारणंही सांगितली

Maharashtra Live News Update: आमदार सचिन अहिर यांनी आमदार अमोल मिटकरींना दिला नवा चष्मा गिफ्ट

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; जवळचा नेता भाजपने गळाला लावला

SCROLL FOR NEXT