Saam Tv
देश विदेश

Kuno cheetah Rescued: कुनोतून फरार झालेल्या चित्त्यांबद्दल समोर आली मोठी अपडेट, एक जेरबंद तर दुसरा...

Kuno National Park: ओवानला जेरबंद केल्यानंतर वन विभागाच्या टीमने सुटकेचा निश्वास सोडला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Madhya Pradesh News : कुनो नॅशनल पार्कमधून (Kuno National Park) फरार झालेला चित्ता ओवानला जेरबंद करण्यात अखेर यश आलं आहे. गेल्या सहा दिवसांपासून फरार असलेल्या ओवानला गुरुवारी वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन करत जेरबंद केलं. ओवानला घेऊन वन विभागाची टीम कुनो नॅशनल पार्कमध्ये दाखल झाली आहे. ओवानला जेरबंद केल्यानंतर वन विभागाच्या टीमने सुटकेचा निश्वास सोडला आहे.

गेल्या सहा दिवसांपासून ओवान चित्ता फरार होता. तो कुनो नॅशनल पार्कमधून बाहेर पडत रहिवासी भागामध्ये घुसला होता. या सहा दिवसांमध्ये तो वेगवेळ्या गावांमध्ये फिरत होता. यावेळी त्याने एका गायीची शिकार केली होती. चित्ता गावाच्या आसपास असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. शेताकडे जाण्यासाठी गावकरी घाबरत होते. वन विभागाची टीम ओवानच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून होती.

ओवान स्वत:हून कुनो नॅशनल पार्कमध्ये परत जावा यासाठी वन विभागाच्या टीमकडून प्रयत्न सुरु होते. पण तो काय परत जाण्यास तयार नव्हता. त्यामुळे त्याला जेरबंद करण्यासाठी दक्षिण अफ्रीकेवरुन वाईल्ड लाईफ सेस्क्यू टीमला (wildlife team from africa) बोलावण्यात आले होते. गुरुवारी संध्याकाळी या स्पेशल टीमने बैराडनजीकच्या डाबरपुरा गावातून ओवानला जेरबंद केले. आता ओवानला पुन्हा कुनोमध्ये सोडण्यात येणार आहे.

ओवाननंतर मादी चित्ता आशा देखील फरार झाली आहे. मादी चित्ता आशा ही गेल्या चार दिवसांपासून कुनो नॅशनल पार्कच्या बाहेरील जंगलामध्ये फिरत आहे. आशाच्या देखील हालचालीवर वनविभाग नजर ठेवून आहे. गुरुवारी आशा वीरपूर गावातील प्रसिद्ध धौरेट सरकार मंदिराच्या जंगलामध्ये दिसली होती. हा परिसर कुनो नॅशनल पार्कच्या बफर झोनअंतर्गत येतो. आशाला देखील जेरबंद करुन पुन्हा कुनोत आणण्यासाठी वन विभागाच्या टीमकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त नामिबियामधून (Namibia) 8 चित्त्यांना भारतात आणण्यात आले होते. नामिबियातून आणलेल्या आठ चित्त्यामध्ये 5 नर आणि 3 मादी चित्त्यांचा समावेश होता. मध्य प्रदेशच्या श्योपूर जिल्ह्यातील कुनो नॅशनल पार्कमध्ये पीएम मोदींनी या चित्त्यांना सोडले होते. काही दिवसांपूर्वीच एक मादी चित्ता साशाचा संसर्गामुळे मृत्यू झाला होता.

Edited By - Priya Vijay More

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरमध्ये दाखल

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT