Sanja Recipe: संध्याकाळी लागलेल्या हलक्या भूकेसाठी झटपट घरी बनवा खमंग आणि चविष्ट सांजा, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

तिखट मिठाचा सांजा बनवण्यासाठी रवा, कांदा, हिरवी मिरची, मोहरी, हिंग, कढीपत्ता, हळद, पाणी, मीठ, तेल, साखर, कोथिंबीर, नारळ आणि शेव इत्यादी साहित्य लागते.

Sanja Recipe | yandex

रवा भाजण्याची प्रक्रिया

मध्यम आचेवर कढई गरम करून त्यात तूप घाला व रवा ४–५ मिनिटे हलक्या हाताने भाजा. रव्याचा रंग बदलण्याची गरज नाही. भाजलेला रवा बाजूला काढून ठेवा.

Sanja Recipe | yandex

शेंगदाणे तळणे

कढईत थोडं तेल गरम करून शेंगदाणे मध्यम आचेवर हलके तपकिरी होईपर्यंत तळा. न आवडल्यास आधी भाजलेले शेंगदाणेही वापरू शकता.

Sanja Recipe | yandex

फोडणी तयार करणे

त्याच कढईत मोहरी घालून तडतडू द्या, जिरे घालून परतवा. त्यानंतर कांदा, कढीपत्ता व हिरवी मिरची घालून कांदा नरम होईपर्यंत परतवा.

Sanja Recipe | yandex

मसाले घालणे

कांदा नरम झाल्यावर आले व हळद घालून एक मिनिट परता, ज्यामुळे छान सुगंध येतो.

Sanja Recipe | yandex

रवा शिजवणे

भाजलेला रवा फोडणीत घालून नीट मिसळा. हळूहळू गरम पाणी घालत ढवळा. त्यानंतर दही, मीठ व साखर (ऐच्छिक) घालून मिश्रण एकजीव करा.

Tikhat Mithacha Sanja | yandex

वाफ देणे व सर्व्हिंग

झाकण ठेवून अतिशय मंद आचेवर ८–१० मिनिटे वाफ द्या. वरून कोथिंबीर घालून मिक्स करा. सर्व्ह करताना शेंगदाणे, किसलेला नारळ, शेव व लिंबाची फोड घालू शकता.

Sanja Recipe | Saam Tv

Saree Stylish Blouse Design: पार्टी वेअर किंवा साध्या साडीवर शोभून दिसतील हे 7 ट्रेंडी स्टायलिश ब्लाउज

Saree Stylish Blouse Design | Saam Tv
येथे क्लिक करा