New Delhi: महागाईने त्रस्त सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि तितकीच दिलासादायक बातमी समोर येत आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती कपात होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नैसर्गिक वायूच्या किंमती निश्चित करण्यासाठीच्या नवीन सूत्रानुसार 2014 च्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सीएनजी आणि एलपीजीच्या किमतींवरही कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली. (Latest MArathi News)
अनुराग ठाकूर यांनी याबाबत सांगितलं की, नवीन सूत्रानुसार आता घरगुती नैसर्गिक वायूची किंमत भारतीय क्रूड बास्केटच्या जागतिक किमतीच्या मासिक सरासरीच्या 10 टक्के असेल. दर महिन्याला त्याची माहिती दिली जाईल, तर आतापर्यंत वर्षातून दोनदा त्यांचा आढावा घेतला जात होता.
नवीन फॉर्म्युला ठरवण्यासाठी सरकारने ऑक्टोबर 2022 मध्ये किरीट पारीख यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या निर्णयामुळे गॅसच्या आंतरराष्ट्रीय किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने होणाऱ्या तोट्यातून ग्राहकांची सुटका होणार आहे.
घरगुती गॅसचे दर निश्चित करण्याच्या प्रक्रियेत शनिवारपासून बदल केले जाणार आहेत. या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे देशातील PNG च्या किमती 10 टक्के आणि CNG च्या किमती 6 टक्के ते 9 टक्क्यांनी कमी होतील.
पुणे, मुंबईत नागरिकांना कसा फायदा होईस?
मुंबईत गॅस 5 रुपयांनी स्वस्त होऊ शकतो. येथे सीएनजी 87 रुपये प्रति किलो आहे, तो 79 रुपयांपर्यंत कमी केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे पीएनजीची किंमत 54 रुपये आहे, जी 49 रुपयांपर्यंत कमी होऊ शकते.
पुण्यात गॅस 5 रुपयांनी स्वस्त होऊ शकतो. सध्या पुण्यात सीएनजीचा दर 92 रुपये प्रति किलो आहे. तो आता 87 रुपयांपर्यंत कमी होऊ शकतो. त्याचप्रमाणे पीएनजी 57 रुपये प्रति किलो आहे, जो 52 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.