Sharad Pawar Letter To Central Government: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लिहिलेल्या पत्रानंतर केंद्र सरकारने सावध भूमिका घेतली आहे. पवार यांनी आज केंद्र सरकारला पत्र लिहून सरकार भविष्यात लोणी आणि तूप दुग्ध उत्पादनांच्या आयातीचा विचार करत आहे. केंद्र सरकारचा या संदर्भातील कोणताही निर्णय स्वीकारता येणार नाही असे नमूद केले होते. पवारांच्या या पत्रानंतर सरकारने स्पष्टीकरण दिले आहे.
तूप आणि लोणी आयतीबाबत बाजारातील मागणी आणि पुरवठा स्थितीबाबत सरकार लक्ष ठेवून आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ असे स्पष्टीकरण पवारांच्या पत्राबाबत उत्तर देताना केंद्रीय दुग्धव्यवसाय मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे.
केंद्र सरकारने म्हटले की, देशातील लाखो दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दुग्धव्यवसाय हे उपजीविकेचे प्रमुख साधन आहे याची भारत सरकारला चांगली जाणीव आहे. सरकारच्या सर्व योजनांचा उद्देश ते अधिक बळकट करणे आहे. तथापि, ही वस्तुस्थिती आहे की डेअरी क्षेत्रात मागणी आणि पुरवठ्यात काही तफावत आढळून आली आहे. मुख्यत: कोविड-19 महामारीनंतर पौष्टिक, सुरक्षित आणि आरोग्यदायी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत वाढ झाली आहे.
केंद्र सरकारने सांगितले की, वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आणि आगामी उन्हाळी हंगामात दुधाचा पुरवठा कमी होऊ शकतो हे लक्षात घेऊन, अनेक दुग्ध सहकारी संस्थांकडून संरक्षित दुग्धजन्य पदार्थ, दुधाचे फॅट आणि पावडर आयात करण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर, NDDB भारत सरकारसह मागणी-पुरवठ्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवत आहे. आयात प्रक्रियेस वेळ लागत असल्याने, कोणत्याही प्रसंगाच्या वेळी परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक बॅक एंड प्रक्रिया केल्या जात आहेत, असे केंद्राने पत्रात म्हटले आहे.
परिस्थितीची हमी असल्यास, दुग्ध सहकारी संस्थांना उन्हाळ्याच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी परिस्थिती सुलभ करण्यासाठी आयात केली जाऊ शकते. तथापि, त्या बाबतीत हे देखील सुनिश्चित केले जाईल की ते फक्त NDDB द्वारेच मार्गी लावले जाईल आणि योग्य मूल्यांकनानंतर गरजू युनियन्सना बाजारभावानुसार साठा दिला जाईल,असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
इम्स ऑफ इंडिया (Times Of India) या वृ्त्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनंतर शरद पवार यांनी हे पत्र लिहले. ज्यामध्ये त्यांनी लिहिले की, केंद्र सरकार भविष्यात लोणी आणि तूप दुग्ध उत्पादनांच्या आयातीचा विचार करत असल्याचे पेपरमध्ये वाचले, केंद्र सरकारचा या संदर्भातील कोणताही निर्णय स्वीकारता येणार नाही असे नमूद केले होते. केंद्र सरकारने डेअरी प्रॉडक्ट्स म्हणजेच दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसेल त्यामुळे या निर्णयाबाबत विचार करावा असे पवारांनी म्हटले होते.
तसेच देशातल्या दूध उत्पादनांवर याचा थेट परिणाम होईल. कोविड १९ च्या संकटातून आपण आत्ता कुठे बाहेर पडतो आहोत अशा निर्णयामुळे मात्र डेअरी क्षेत्राचं मोठं नुकसान होईल. मी जी चिंता व्यक्त करतो आहे ती गांभीर्याने घ्या. हा निर्णय जर केंद्र सरकारने मागे घेतला तर मला आनंदच होईल असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.