Sharad Pawar News: पेपरमधील बातमी वाचताच शरद पवारांचं दुग्धविकास मंत्र्यांना पत्र, 'त्या' निर्णयावर घेतला आक्षेप; (पाहा व्हिडिओ)

Sharad Pawar Wrote Letter To Union Minister: टाइम्स ऑफ इंडिया (Times Of India) या वृ्त्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनंतर शरद पवार यांनी हे पत्र लिहले.
Sharad Pawar
Sharad PawarSaam TV
Published On

Sharad Pawar Twit: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रिय दुग्ध मंत्र्यांना (Union Minister) पत्र लिहले आहे. टाइम्स ऑफ इंडिया (Times Of India) या वृ्त्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनंतर शरद पवार यांनी हे पत्र लिहले. ज्यामध्ये त्यांनी आजच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार केंद्र सरकार भविष्यात लोणी आणि तूप दुग्ध उत्पादनांच्या आयातीचा विचार करत आहे. केंद्र सरकारचा या संदर्भातील कोणताही निर्णय स्वीकारता येणार नाही, असे नमूद केले आहे.

Sharad Pawar
Roshni Shinde beating case: रोशनी शिंदे मारहाण प्रकरण! राज्य महिला आयोगाने घेतली दखल; ठाणे पोलीस आयुक्तांना दिले महत्वाचे आदेश

याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्र सरकारने डेअरी प्रॉडक्ट्स म्हणजेच दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसेल त्यामुळे या निर्णयाबाबत विचार करावा अशी मागणी करत शरद पवार (Sharad Pawar) यांनी हे पत्र लिहिलं आहे. शरद पवारांनी हे पत्र ट्विटरवरुन शेअर केले आहे.

या पत्रामध्ये ते म्हणतात की, ?आज मी एका इंग्रजी वृत्तपत्रात बातमी वाचली. त्यानुसार मला हे समजलं की केंद्र सरकार दुग्धजन्य पदार्थ म्हणजेच लोणी, तूप वगैरे पदार्थ आयात करण्याचा निर्णय घेतं आहे. केंद्र सरकारने असा निर्णय घेतला तर त्याचा आम्ही निषेध करू कारण या आयातीचा परिणाम थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांवर होईल."

Sharad Pawar
Gautami Patil News: 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर गौतमी पाटील अलर्ट! खबरदारीसाठी केली नवीन खरेदी; आता थेट...

तसंच देशातल्या दूध उत्पादनांवर याचा थेट परिणाम होईल. कोविड १९ च्या संकटातून आपण आत्ता कुठे बाहेर पडतो आहोत अशा निर्णयामुळे मात्र डेअरी क्षेत्राचं मोठं नुकसान होईल. मी जी चिंता व्यक्त करतो आहे ती गांभीर्याने घ्या. हा निर्णय जर केंद्र सरकारने मागे घेतला तर मला आनंदच होईल असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com