Marriage Rumors of Bageshwar Baba and Model Harsha Rishariya  Saam Tv
देश विदेश

Model Harsha Rishariya: मॉडेल साध्वी बागेश्वर बाबाशी लग्न करणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Marriage Rumors of Bageshwar Baba and Model Harsha Rishariya: बागेश्वर बाबा आणि महाकुंभात चर्चेत आलेल्या सुंदर हर्षा रिछारिया लग्न करणार आहेत दोघं आता लग्न करणार असल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय आहे हे घ्या जाणून...

Priya More

संदीप चव्हाण, साम टीव्ही

बागेश्वर बाबा आणि मॉडेल साध्वी लग्न करणार आहेत? हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. मात्र, सोशल मीडियावर केलेला दावा खरा आहे का? खरंच दोघं लग्न करणार आहेत का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय ते आपण पाहणार आहोत...

ऐकलंत... बागेश्वर बाबाला कुणीतरी लग्नासाठी प्रपोज केलंय. आणि हे प्रपोज महाकुंभात चर्चेत आलेल्या हर्षा रिछारियाने केल्याचा दावा केलाय. पण, खरंच हे दोघं लग्न करणार आहेत का...? ...बागेश्वर बाबा आणि महाकुंभात चर्चेत आलेल्या सुंदर हर्षा रिछारिया लग्न करणार आहेत दोघं आता लग्न करणार असल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये बाबा बागेश्वर काहीसे वैतागलेले पाहायला मिळतायत. त्यांच्या हातात मोबाईल आहे आणि ते बागेश्वर धामचं ऑफिशिअल युट्यूब चॅनलवरची कमेंट वाचत असल्याचं सांगत आहेत.'एक विचित्र कमेंट माझ्याकडे आली आहे आणि त्यामध्ये लिहिलं आहे की, मी तुमच्याशी लग्न करण्यासाठी प्रस्ताव मांडला होता. माझ्या स्वप्नात बालाजी आला होता, मग मी तुमचा होकार समजू?'

हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आम्ही याची पडताळणी केली. खरंच बागेश्वर बाबा आणि हर्षा रिछारिया लग्न करणार आहेत का? की ही अफवा आहे? सध्या सोशल मीडियावरही अनेकजण हाच प्रश्न विचारताय. त्यामुळे याचं सत्य शोधून काढण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी केली. त्यावेळी आम्हाला यात आणखी व्हिडिओ सापडला.

त्या पूर्ण व्हिडिओ बागेश्वर बाबा काय म्हणतायेत की, अजिबात होकार समजू नका ताई. राखी ठेवून घ्या, रक्षाबंधनला नक्की भेटायला या. वेलकम टू यू. तुम्हाला लाज वाटत नाही की, मनात आलं म्हणून बागेश्वर धामसारख्या ऑफिशिअल अध्यात्मिक चॅनलवर अशी कमेंट करता.जर मला लग्नच करायचं असेल, तर आम्ही युट्यूबवरुन थोडीच करणार आहोत. आम्ही माताजींच्या आज्ञेनं लग्न करू.

त्यामुळे आमच्या पडताळणीत बागेश्वर बाबा-हर्षा रिछारियाच्या लग्नाची अफवा असल्याचे सत्य समोर आले आहे. बागेश्वरबाबा वाचून दाखवत असलेला मेसेज दुसऱ्या व्यक्तीचाच आहे. हर्षा रिछारियाने बागेश्वर बाबाला मेसेज केलेला नाही. व्हिडिओ एडिट करून व्हायरल करण्यात आला आहे. हर्षा रिछारिया ही महाकुंभात गेल्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. तिला साध्वीही बोलण्यात आलं. त्याचाच फायदा घेत आता बागेश्वर बाबा आणि हर्षा रिछारिया लग्न करणार असल्याचे मेसेज व्हायरल केले. मात्र, यात तथ्य नसून, आमच्या पडताळणीत दोघं लग्न करणार असल्याचा दावा असत्य ठरलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

SCROLL FOR NEXT