उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभमेळ्याला भीषण आग लागली आहे. सेक्टर १९मध्ये सिलिंडरचा स्फोट झालाय. तंबूमध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्यानं भीषण आग सर्वत्र पसरलीय.
प्राथमिक अहवालानुसार, कॅम्प साइटवर आग लागली आहे आणि त्या भागात बसवलेल्या अनेक तंबूंना या आगीने वेढले आहे.
ही आग शास्त्री ब्रिज आणि रेल्वे पुलाच्यामध्ये लागली आहे. कॅम्पमध्ये ठेवलेले सिलिंडर एकामागून एक ब्लास्ट होऊ लागले आहे. तसेच आकाशात धुराचे लोट पाहायला मिळत आहे.
आग लागल्यानंतर क्षणातच १०० मीटरपर्यंत वेगाने पसरलीय. यामुळे महाकुंभमेळ्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अग्निशमन दलाच्या ५० गाड्या दाखल झाले आहेत. त्यांना मदत करण्यासाठी एनडीआरएफचे एक पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे.
तसेच सीआरपीएफचे जवान आणि रूग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असून, बचावकार्य देखील सुरू आहे.
लागलेली आग वेगाने सेक्टर २०च्या दिशेने पसरत आहे. याचा फटका गीता प्रेस गोरखपूरच्या कॅम्पलाही बसलाय. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून, एक पाठोपाठ एक १२ हून अधिक सिलिंडरचा स्फोट झालाय.
एकामागोमाग एक सिलिंडर फुटल्याने अग्निशमन दलाला मदत आणि बचाव कार्यात अडचण येत आहे.
आग विझवण्यासाठी गेलेले फायर इंजिन वाळूत अडकले आहेत. त्यामुळे आग विझवण्यात अडचणी येत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.