ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे हा महाकुंभ मेळा भरवण्यात आला आहे. यामध्ये देशभरातून लाखो भक्त सहभाग घेतात.
याच कुंभमेळ्यातील एका उच्च शिक्षित म्हणजेच IITIAN बाबाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
IITIAN बाबाचे खरं नाव अभय सिंह आहे. त्याचा जम्न हरियाणामध्ये झाला.
आयआयटी बॅाम्बे IIT Bombay मधून त्याने एरोस्पेसमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षम पूर्ण केले आहे.
IITIAN बाबाने सांगितले की इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करुन त्याने फोटोग्राफी करण्यास सुरुवात केली. यानंतर त्याने कॅनडामध्ये देखील काम केले.
अभय सिंह म्हणाले की, मी ज्ञान गोळा करण्याचे काम करत आहे. याव्यतिरिक्त जीवनाचा उद्देश काय आहे याचा शोध घेत आहे.
व्हायरल झालेल्या IITIAN बाबाने सांगितले की, गेल्या दीड वर्षापासून त्यांनी आपल्या कुटुंबाशी कोणत्याही प्रकारचा संवाद केला नाही.
सोशल मीडियार व्हायरल झाल्यानंतर IITIAN बाबाला जुना आखाडामधून निष्कासित केल्याची माहिती मिळत आहे.