ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिवाळ्यात अधिक थंडीमुळे आपली स्कीन ड्राय होते.
स्कीन ड्राय झाल्यामुळे चेहऱ्यालरील चमक हरवते आणि सुरकुत्या स्पष्टपणे दिसू लागतात.
जर तुम्हीही ड्राय स्कीनमुळे त्रस्त असाल तर बदामाचे तेल तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते.
बदामामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे स्कीन सुधारण्यात मदत होते.
हिवाळ्यात झोपण्यापूर्वी स्कीनवर आठवड्यातून दोन ते तीन दिवस शुद्ध बदामाचे तेल लावा.
तेल लावून हलक्या हाताने मसाज करा.यामुळे चेहरा चमकदार होईल.
जर तुम्हाला डार्क सर्कलस असतील तर तुम्ही डोळ्याखाली बदामाचे तेल लावू शकता.