ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शॅापिंग करणे जवळपास प्रत्येक मुलीला आवडतं. परंतु खरच शॅापिंग करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का. जाणून घ्या.
खरेदीमुळे मानसिक ताण कमी होतो.
शॅापिंग केल्याने शरीरातील एंडोर्फिन हार्मोन रिलीज होतात. त्यामुळे आनंद मिळतो.
हे एक प्रकारचे मूड बूस्टर आहे. ज्यामुळे ताणतणाव दूर होतो.
कोणत्याही प्रकारची वस्तू किंवा सामान खरेदी करताना आपल्याला नवनवीन गोष्टी दिसतात. यामुळे मानसिक उत्तेजन मिळते.
खरेदी करताना आपण लोकांसोबत संवाद साधतो. किंवा इन्टरअॅक्ट करतो. यामुळे एकाकीपणा कमी होतो.
अनेकांसाठी शॅापिंग भावनात्मक गोष्ट असते. तसेच शॅापिंग सोशल इन्टरअॅक्शनचा चांगला मार्ग असू शकतो.
शॅापिंग करणे अनेकदा आपल्या मानसिक आरोग्याशी संबधित असते. त्यामुळे याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.