Kumar Viswas  
देश विदेश

Kumar Viswas : कुमार विश्वास यांच्या सुरक्षा रक्षकांना मारहाण, कार ओव्हरटेक केल्याचा वाद टोकाला; डॉक्टरचीही तक्रार

Kumar Viswas : कवी कुमार विश्वास यांच्या सुरक्षा रक्षकांना मारहाण झाल्याची घटना गाझियाबाद येथे घडलीय.

Bharat Jadhav

Kumar Viswas:

कवी कुमार विश्वास यांच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकांवर हल्ला झाल्याची घटना घडलीय. या मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका डॉक्टरने सुरक्षा रक्षकांना मारहाण केल्याचा आरोप आहे. कुमार विश्वास यांनीही या घटनेची माहिती एक्स पोस्टद्वारे दिली आहे. (Latest News)

अलिगढला जाताना वसुंधरास्थित घरातून जेव्हा बाहेर पडलो, त्यावेळी हिंडनच्या तटावर एका कारचालकाने ताफ्यातील सुरक्षा रक्षकांच्या कारला दोन्ही बाजूने धडक देत हल्ल्याचा प्रयत्न केला. कारमधून उतरून सुरक्षा रक्षकांनी त्या व्यक्तीला जाब विचारण्यासाठी थांबवले त्यावेळी त्याने उत्तर प्रदेश पोलीस कर्मचाऱ्यावरच नाही तर, केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांवरही हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. कारण समजू शकलेले नाही, अशी माहिती कुमार विश्वास यांनी एक्स पोस्टद्वारे दिली.

या मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. एका कारमध्ये डॉक्टर बसलेला दिसत आहे. त्याच्या तोंडावर जखम झाली असून, रक्तस्राव होत असल्याचे या व्हिडिओत दिसते. रिपोर्टनुसार, ओव्हरटेक करण्यावरून सुरक्षा रक्षक आणि डॉक्टरमध्ये हा वाद झाला.

इंदिरापूरम कोतवाली परिसरातील वसुंधरा सेक्टरमधील एलिवेटेड रस्त्यावर हा वाद झाला. कुमार विश्वास यांच्या सुरक्षा रक्षकांनी आपल्याला मारहण केल्याचा आरोप डॉक्टरने केलाय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कार बाजूला करण्यावरून सुरक्षा रक्षक आणि आपल्यात वाद झाला. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी आपल्याला मारहाण केली असल्याचा आरोप डॉक्टरने केला आहे. मारहाण झाल्यानंतर डॉक्टरने ११२ क्रमांकावर संपर्क साधत पोलिसांना याची माहिती दिली. परंतु खूप वेळ होऊनही कोणी आले नसल्याचंही डॉक्टरने सांगितले. या प्रकरणी डॉक्टरांनीही इंदिरापुरम पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मतमोजणीला सुरुवात

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

SCROLL FOR NEXT