Kumar Vishwas News: दिल्लीच्या नेतृत्वाचा अहंकार कमी करण्याची प्रेरणा महाराष्ट्राने दिली; कुमार विश्वास यांचं वक्तव्य चर्चेत

Sahitya Sammelan: अखिल भारतीय साहित्य संमेलनात कुमार विश्वास यांनी दिल्लीच्या नेतृत्वाबाबत मोठं वक्तव्य केलं.
kumar vishwas
kumar vishwasSaam tv
Published On

Akhil Bhartiya Sahitya Sammelan: ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घानाला सुप्रसिद्ध कवी डॉ. कुमार विश्वास यांनी हजेरी दर्शवली. या संमेलनात कुमार विश्वास यांनी दिल्लीच्या नेतृत्वाबाबत मोठं वक्तव्य केलं.

'दिल्लीच्या नेतृत्वामध्ये जेव्हा अहंकार निर्माण झाला. त्यावेळी तो कमी करण्यासाठी महाराष्ट्राने प्रेरणा दिली. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ही प्रेरणा निर्माण झाली आहे, असं मोठं वक्तव्य कवी कुमार विश्वास यांनी केलं. (Latest Marathi News)

kumar vishwas
Marathi Sahitya Sammelan : अखिल भारतीय साहित्य संमेलनात गोंधळ, मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी विदर्भवाद्यांची घोषणाबाजी

96 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन विदर्भात होत आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनलास सुप्रसिद्ध कुमार विश्वास यांनी उपस्थिती दर्शवली. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान कुमार विश्वास (Kumar Vishwas) यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे.

या कार्यक्रमादरम्यान, कुमार विश्वास म्हणाले, 'हिंदी भाषेचे इतके मोठे संमेलन मी पाहिले नाही. साहित्याचे मोठे राजकारण उभं राहिलं तर साहित्य नष्ट होईल. राजकारण जेव्हा अडखळते, तेव्हा साहित्य त्याला सांभाळते. चॅनलवर वाईट दिसू नये म्हणून त्यांनी चॅनल विकत घेतले आहेत. दिल्लीतील सिंहासनाला जेव्हा अहंकार येतो, तेव्हा साहित्यिक त्यांना जागं करते'.

kumar vishwas
Shivjayanti 2023: सिनेमाला परवानगी देता, शिवजयंतीला का नाही? पुरातत्व विभागाला हायकोर्टाची विचारणा

डॉ. कुमार विश्वास पुढे म्हणाले, मी ज्या भाषेतून येतो त्यामुळे मला थोडा जास्त स्वीकृती आणि स्नेह मिळतो. मात्र, त्या भाषेतील संमेलनाला मी एवढी मोठी गर्दी कधीही पहिली नाही. मागे बसलेल्याना समोर बसवत साहित्य संमेलनाचे आयोजन करायला हवे. जेव्हा जेव्हा साहित्य राजकारणाच्या सोबत उभे राहिले तेव्हा एकतर साहित्य संपेल किंवा राजकारण संपेल.

'साहित्य आणि राजकारण या दोन्हीही विभिन्न गोष्टी आहेत. प्रसार माध्यमांमुळे परिस्थितीमध्ये बदल होतो आहे. जनतेने दिलेली ऊर्जा, बळ याचा आधार घेत समाजाच्या विरोधात कार्य करणाऱ्या प्रकृतींवर आवाज उठवणे हे साहित्यिकांचे काम आहे', असे कुमार विश्वास पुढे म्हणाले.

kumar vishwas
Amravati Graduate Constituency : मतमोजणी करणाऱ्या अधिकाऱ्याचं हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

दिल्लीच्या (Delhi) नेतृत्वावरही कुमार विश्वास यांनी टीकास्त्र सोडलं. 'दिल्लीच्या नेतृत्वामध्ये जेव्हा अहंकार निर्माण झाला. त्यावेळी तो कमी करण्यासाठी महाराष्ट्राने प्रेरणा दिली . छत्रपती शिवाजी महाराजांपासून ही प्रेरणा निर्माण झाली आहे, असेही कुमार विश्वास म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com