Ananya Banerjee TMC: पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. कोलकाता महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक १०९ च्या तृणमूल काँग्रेसच्या नगरसेविका अनन्या बॅनर्जी या नव्या वादात सापडल्या आहेत. मुकुंदपूर येथील त्यांच्या कार्यालयात काही आक्षेपार्ह वस्तू आढळल्याचा आरोप भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी केला आहे.या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जाणून घेऊयात या अनन्या बॅनर्जी नक्की आहेत तरी कोण?
सोमवारी सकाळी पोलिस काही भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक नगरसेविकेच्या कार्यालयात पोहोचले. त्यावेळी कार्यालयात कंडोमची पाकिटे, मसाज मशीन,मोठ्या प्रमाणात रोकड आणि स्वतंत्र मेकअप रूम असल्याचे त्यांना आढळले. सरकारी कामकाजासाठी वापरल्या जाणाऱ्या कार्यालयात अशा वस्तू आढळल्याच्या आरोपामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणाला आणखी गंभीर वळण देणारी बाब म्हणजे कार्यालयातून एक पिवळ्या रंगाची नोंदवही सापडली.या नोंदवहीत काही व्यक्तींची नावे आणि आर्थिक व्यवहारांची माहिती नोंद करण्यात आली होती. यासह, सरकारी नोकऱ्या मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
कोण आहे अनन्या बॅनर्जी
अनन्या बॅनर्जी या कोलकाता महानगरपालिकेतील परिचित चेहरा आहेत.राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून काम केले होते. २००० साली ‘मिस कलकत्ता’ किताब जिंकल्यानंतर त्यांनी मनोरंजन क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली. त्यानंतर त्या राजकारणात दाखल झाल्या आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख महिला नेत्यांपैकी एक म्हणून काम करु लागल्या.
दरम्यान, या आरोपांवर प्रतिक्रिया देताना अनन्या बॅनर्जी यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळले आहेत. कार्यालयाच्या चाव्या त्यांच्या ताब्यात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, कार्यालयात ठेवण्यात आलेल्या काही वस्तू ईदच्या काळात गरजूंना वाटप करण्यासाठी ठेवलेल्या मदत साहित्याचा भाग असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र कंडोम, मसाज मशीन आणि इतर आक्षेपार्ह वस्तूंबाबत त्यांनी कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नाही. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणामुळे कोलकत्ताचे राजकारण मोठ्या प्रमाणात तापले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.