Kolkata Doctor Death Case Saam Tv
देश विदेश

महिला डॉक्टरासोबत अत्याचार, देशभरात पडसाद, सीबीआयडे प्रकरण देण्याची तयारी, डीनचा राजीनामा, दिल्ली AIIMS ची OPD बंद!

Kolkata Doctor Death Case: पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ आज निवासी डॉक्टरांचा देशव्यापी संप केला. दिल्लीतील एम्ससह अनेक सरकारी रुग्णालयांचे निवासी डॉक्टर संपावर आहेत.

Satish Kengar

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ आज निवासी डॉक्टरांचा देशव्यापी संप केला. दिल्लीतील एम्ससह अनेक सरकारी रुग्णालयांचे निवासी डॉक्टर संपावर आहेत. ओपीडी, ओटी आणि वॉर्ड सेवा ठप्प आहेत. दिल्लीच्या लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, कलावती हॉस्पिटल, सुचेता कृपलानी, सफदरजंग हॉस्पिटल, राम मनोहर लोहिया (आरएमएल), लोकनायक हॉस्पिटल, जीबी पंत, दीनदयाल उपाध्याय हॉस्पिटलमध्ये ओपीडी सेवा, वैकल्पिक शस्त्रक्रिया आणि प्रयोगशाळा सेवा बंद होत्या. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल झाले.

निवासी डॉक्टरांची देशव्यापी संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ ऑल इंडिया रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रोहन कृष्णन यांनी सांगितले की, आज दिल्लीतील सर्व रुग्णालयांमध्ये निवासी डॉक्टर संपावर आहेत. मात्र, या काळात आपत्कालीन सेवा सुरू राहतील. डॉक्टर्स असोसिएशनने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

देशात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर आर.जी. कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाचे डीन डॉ.संदीप घोष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पदाचा राजीनामा देताना ते म्हणाले, ''सोशल मीडियावर माझी बदनामी केली जात आहे. मृत डॉक्टर मला माझ्या मुलीसारखीच होती. पालक म्हणून मी राजीनामा देत आहे. भविष्यात अशा प्रकारची घटना कोणासोबतही घडू नये.''

ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?

महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणी बोलताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. या प्रकरणात जो कोणी सहभागी असेल त्यांना त्वरित शिक्षा झैच पाहिजे. त्या पुढे म्हणाल्या की, जर कोलकाता पोलिसांना 18 ऑगस्टपर्यंत या प्रकरणाचा छडा लावणे शक्य झाले नाही, तर आम्ही ते सीबीआयकडे सोपवू.

दरम्यान, या आंदोलनाचा थेट परिणाम ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांवर होत आहे. आजपासून निवासी डॉक्टर आपत्कालीन विभागाशिवाय कोणत्याही विभागात काम करणार नाहीत, अशी घोषणा डॉक्टरांच्या संघटनेने केलीय. आरएमएलमध्ये सध्या 1500 निवासी डॉक्टर संपावर बसले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कामावर गेला, परत आलाच नाही, विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू; निधनाचे वृत्त कळताच आईने...

Human anatomy facts: मानवी शरीरात किती रक्तवाहिन्या असतात? जाणून घ्या आकडा

Manoj Jarange: जीआर फक्त निमित्त, काहीतरी मोठा डाव शिजतोय; मनोज जरांगेंना संशय

Sanjay Raut : त्यांनी राजन विचारेंचे पाय धुतले पाहिजे, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात; Video

Jalgaon : दीड वर्षांपूर्वी झाला विवाह; माहेरी आलेल्या विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पित्याचा सासरच्यांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT