Chandrayaan-3 Launch Today Saam TV
देश विदेश

Chandrayaan 3 Explainer: चांद्रयान ३ अवकाशात झेपावलं, आता पुढे काय, कसा असेल प्रवास? स्वप्नपूर्तीची मोहीम समजून घ्या १० पॉइंट्समध्ये

चांद्रयान ३ ने अवकाशात झेप घेतल्यानंतर आता या यानाची पुढील वाटचाल कशी असेल, जाणून घेऊयात.

Vishal Gangurde

New Delhi: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या चंद्रयान ३ ने आज दुपारी २.३५ मिनिटांनी आवकाशात झेप घेतली आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यान प्रक्षेपित करण्यात आलं आहे. चांद्रयान ३ ने अवकाशात झेप घेतल्यानंतर आता या यानाची पुढील वाटचाल कशी असेल, जाणून घेऊयात. (Latest Marathi News)

1)चांद्रयान-३ कसं काम करणार आहे?

चांद्रयान-३ हे चंद्रावर उतरल्यानंतर त्याचं काम सुरु होईल. हे यान इस्रोमध्ये बसलेल्या वैज्ञानिकांना चंद्राबद्दल माहिती पाठवेल. त्याचबरोबर पाण्याचीही माहिती समोर येणार आहे.

2) चांद्रयान-३ मोहिमेला किती रुपये खर्च झाला?

चांद्रयान-३ मिशन मोहीमेला एकूण ७५ मिलियन लाख डॉलर (६१५ कोटी) खर्च आला आहे.

३) चांद्रयान-३ लाँचिग पाहण्याचं तिकीट काय होतं?

चांद्रयान-३ आकाशात झेपावताना पाहण्यासाठी गॅलरी बनविण्यात आली होती. यात १० हजार लोक बसण्याची क्षमता होती. ही सर्व जागा अवघ्या साडेतीन तासांत बुक झाली. या तिकिटाबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

४) चांद्रयान-३ हे यान च्रंद्रावर केव्हा उतरेल?

चांद्रयान-३ मोहिमेचा उड्डाणाचा वेळ हा १४ जुलै रोजी २.३५ मिनिटे होता. तर २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी हे यान चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे.

५) चांद्रयान-३ चंद्रावर पोहोचण्यास किती वेळ लागेल?

चांद्रयान-३ यानाचं उड्डाण आज १४ जुलै रोजी झालं. हे यानाने अवकाशात झेप घेतल्यानंतर २३-२४ ऑगस्ट रोजी चंद्रावर पोहोचण्याची शक्यता आहे. चांद्रयान-३ हे चंद्रावर पोहोचण्यासाठी ४२ दिवसांचा अवधी लागणार आहे. चांद्रयान-३ हे सुरुवातीला चंद्राच्या कक्षेत उतरेल.

6) चांद्रयानाबद्दल माहिती

चांद्रयान-३ मोहिमेचे तीन प्रमुख मुद्दे आहेत. 'प्रपल्शन, लँडर, रोव्हर'. या मोहिमेचा एकूण खर्च ६०० कोटी रुपये इतका झाला आहे. या मोहिमेसाठी वेगवेगळ्या विभागातील शेकडो वैज्ञानिकांनी सहभाग नोंदवला आहे. (Latest News)

7) चांद्रयान-३ रॉकेट लाँचरबाबत माहिती जाणून घेऊयात.

चांद्रयान-३ या यानाला आकाशात झेपावण्यासाठी लागणारे रॉकेट ४३.५ मीटर लांब आहे. 'फॅट ब्वॉय ' या नावाच्या LVM3-M4 रॉकेटद्वारे यानाने अवकाशात झेप घेतलं.

8) चांद्रयान -३ चा आता प्रवास कसा असेल?

वैज्ञानिकांच्या माहितीनुसार, चांद्रयान-३ आकाशात झेप घेतल्यानंतर ५-६ वेळा भ्रमण करेल. त्यानंतर हळूहळू चांद्रयान-३ चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. यानंतर प्रपल्शन मॉड्युल लँडरबरोबर मोठ्या वेगाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर एका महिन्याची मोठी यात्रा सुरू करेल. त्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० किमी वर जाईल.

९) चांद्रयान-३ किती लांबीचा प्रवास करणार आहे?

चांद्रयान-३ हे यान ३.८४ लाख किलोमीटर लांबीचा प्रवास करेल.

१०)चांद्रयान-३ हे यान चंद्रावर कुठे उतरणार आहे?

चांद्रयान-३ हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरविण्यात येणार आहे. चंद्राचा दक्षिण ध्रुव हा उत्तर ध्रुवापेक्षा मोठा आहे. या भागात पाणी येण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Praniti Shinde : भाजपचे आमदार फक्त जीआरवर, अस्तित्वात नाही; खासदार प्रणिती शिंदे यांची आमदार कल्याणशेट्टींवर टीका

New Marathi Movie: 'वाढलेलं वय अन् लग्नाची जुळवणी', सुबोध भावे अन् तेजश्रीनं घातला घाट; ट्रेलरने उत्सुकता वाढवली

MNS Manifesto: आम्ही हे करु! गडकिल्ले, रोजगार ते महिलांची सुरक्षा, मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध!

Diabetes symptoms: योनीमार्गात जखम किंवा संसर्ग असल्यास असू शकतं मधुमेहाचं लक्षण!

Sanjay Raut News : गद्दारासाठी पक्षाचं अधःपतन केल्याने त्यांना वैफल्य आलंय; संजय राऊतांचा फडणवीसांवर प्रतिहल्ला

SCROLL FOR NEXT