Chandrayaan 3 Launch Video: मोहीम फत्ते! १४० कोटी भारतीयांचं स्वप्न साकार; चांद्रयान - ३ चंद्राकडे झेपावलं.. पाहा खास व्हिडिओ

Chandrayaan 3 Launch Watch Video: भारतीय अंतराळ क्षेत्रामध्ये मैलाचा दगड ठरणाऱ्या चांद्रयानाच्या उड्डाणाकडे संपूर्ण देशाच्या नजरा रोखल्या होत्या.
Chandrayaan 3 Launch Video
Chandrayaan 3 Launch VideoSaamtv
Published On

Chandrayaan 3 Launch Viral Video: भारताची महत्वाकांक्षी मोहिम असलेलं चांद्रयान यशस्वीरित्या ३ लॉन्च करण्यात आली आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन हे २.३५ मिनिटांनी लॉन्च झालं. संपूर्ण भारतीयांसाठी हा महत्वाचा असून अवघ्या देशाचं याकडं लागलं होतं.

एलएमव्ही-३ या रॉकेटचा वापर करुन हे यान लाँच करण्यात आलं. २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी चांद्रयान चंद्रावर लँड होईल. या रॉकेट लॉंचिगचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...

Chandrayaan 3 Launch Video
Zomato Tweet On Chandrayaan-3: चांद्रयान ३ मोहिमेआधी झोमॅटोने ISROच्या वैज्ञानिकांसाठी पाठवली खास डिश; नेटिझन्सकडूनही होतंय कौतुक

करोडो भारतीयांचे स्वप्न साकार....

सध्या देशभरात ‘चांद्रयान-३’ या प्रकल्पाची चर्चा आहे. देशभरातील जनता या प्रोजेक्टच्या यशासाठी ईश्वराकडे प्रार्थना करत होते. भारतीय अंतराळ क्षेत्रामध्ये मैलाचा दगड ठरणाऱ्या चांद्रयानाच्या उड्डाणाकडे संपूर्ण देशाच्या नजरा रोखल्या होत्या.

यावेळी इस्त्रोमधील प्रत्येक हालचाल खूप काही सांगून जात होती. अखेर अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या या चांद्रयानाची मोहिम फक्ते झाली. या अभिमानास्पद क्षणाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे... (Viral Video)

Chandrayaan 3 Launch Video
Akola News : पहिल्याच पावसात पूर्णा नदीवरील पूल वाहून गेला, गोपाल खेड मार्गे वाहतुक सुरु

श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरुन (sriharikota satish dhawan space centre) Chandrayaan-3 चं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. आज घडाळ्यात 2 वाजून 35 मिनिटं झाली आणि भारताने अंतराळात एक नवीन इतिहास रचला. चांद्रयान 3 ने देशातल्या कोट्यवधी लोकांची आशा बनून निधड्या छातीनं श्रीहरीकोटातून उड्डाण केलं. लॉन्चिंगसाठी LVM-3-M4 रॉकेटचा वापर करण्या आलं आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com