Akola News : पहिल्याच पावसात पूर्णा नदीवरील पूल वाहून गेला, गोपाल खेड मार्गे वाहतुक सुरु

अकाेला जिल्ह्यात उत्तम पाऊस झाल्याने शेतक-यांत पेरणीचा उत्साह दिसून येत आहे.
Akola News, Purna River
Akola News, Purna Riversaam tv

- हर्षदा सोनोने 

Akola News : अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील पूल पहिल्याच पावसात वाहून गेला आहे. परिणामी या पूलावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे. गोपाल खेड येथून वाहतूक सुरु असून नागरिकांनी त्या मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra News)

Akola News, Purna River
Tomato Prices : टाेमॅटाेच्या वाढत्या दरांना लागणार ब्रेक, किसान सभेचा 'या' निर्णयास विराेध (पाहा व्हिडिओ)

अकोला (akola) जिल्ह्यात (गेल्या 24 तासांत 125.7 मिलीमीटर पाऊस) गेल्या काही दिवसांपासून उत्तम पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यात पेरणीने जोर धरला आहे. शेतकरी सध्या शेतीच्या कामात व्यस्त आहेत. यावर्षी सोयाबीन आणि कपाशीचा पेरा वाढला आहे. आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून जोरदार पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. दरम्यान पावसामुळे पूर्णा नदीवरील पूल वाहून गेला आहे.

Akola News, Purna River
Crime News : बंटी बबलीच्या कारनाम्याने पाेलिसही चक्रावले, तुमच्यासाेबत रिक्षात असा प्रकार घडला? जरुर तक्रार नाेंदवा

अकोट (akot) तालुक्यातील गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील (purna river) इंग्रजकालीन पूलाची दूरावस्था झाली हाेती. या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर पर्यायी पूल म्हणून नदीच्या आतमध्ये छोटा चार कोटींचा पूल बांधण्यात आला होता. मात्र हा पूल वाहून जाईल अशी शक्यता पूल बांधतानाच व्यक्त करण्यात येत होती.

Akola News, Purna River
Bhusaval-Daund MEMU Weekly Special Train : रेल्वे प्रवाशांनाे ! भुसावळ-दौड-भुसावळ मेमू ट्रेन रद्द; जाणून घ्या कारण (पाहा व्हिडिओ)

हा पूल बांधण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी त्यांच्या विकास निधीतून चार कोटी रुपये मंजूर केले होते. त्यानंतर पूलाचे बांधकाम झाले. त्यावरून वाहतूक सुरू करण्यात आली होती.

या छोट्या पुलावरून जात असताना वाहनधारकांना जीव मुठीत धरून जावे लागत होते. गेेले दोन दिवस झालेल्या पावसामुळे पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पहिल्याच पुरात हा पूल वाहून गेला आहे. त्यामुळे या पुलावरील (road closed) वाहतूक बंद करण्यात आली आहे. सध्या गोपाल खेड येथून वाहतूक सुरु करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com