Chandrayaan-3: भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोची (ISRO) सर्वात महत्वकांक्षी मोहिम 'चांद्रयान- 3' चे (Mission Chandrayaan-3) अखेर अवकाशात यशस्वी प्रक्षेपण झाले आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या चंद्रयान- 3 ने आज दुपारी 2.35 मिनिटांनी आवकाशात झेप घेतली. आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून चांद्रयान-3 चं प्रक्षेपण करण्यात आले.
इस्रोचे 'बाहुबली रॉकेट' म्हणजेच LVM-3 मधून चांद्रयान-3 वेगाने आवकाशाच्या दिशेने झेपावले. चांद्रयान -3 चे यशस्वी प्रक्षेपण होताच इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांनी एकच जल्लोष केला. त्याचसोबत सर्व भारतीयांनी हा आनंदाचा क्षण अनुभवला. या मोहिमेत सहभागी असणाऱ्या इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांवर देशभरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) चांद्रयान -3 च्या यशस्व प्रक्षेपणानंतर या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
फ्रान्सच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर ट्वीट करत आनंद व्यक्त केला आहे. अवकाशाच्या जगात हा एक नवीन अध्याय असल्याचे वर्णन त्यांनी केले आहे. पीएम मोदींनी ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, 'चांद्रयान-3 ने भारताच्या अंतराळ प्रवासात एक नवीन अध्याय लिहित आहे. प्रत्येक भारतीयाची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा उंचावत आहेत. ही महत्त्वपूर्ण कामगिरी आपल्या शास्त्रज्ञांच्या अथक समर्पणाची साक्ष आहे. त्यांच्या जिद्द आणि कल्पकतेला माझा सलाम!'
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे. तसंच, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी देखील ट्वीट करत हा अभिमानाचा क्षण असल्याचे सांगात सर्वांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'अभिनंदन!, हा खास क्षण कायम स्मरणात राहील. प्रत्येक भारतीयासाठी हा आजचा दिवस अभिमानास्पद आहे.', असे ट्वीट त्यांनी केले आहे.
LVM3M4 रॉकेटने शुक्रवारी इस्रोच्या महत्त्वाकांक्षी 'चांद्रयान-3'ला पृथ्वीच्या एकमेव उपग्रह चंद्राच्या प्रवासासाठी नेले. या रॉकेटला आधी GSLVMK3 असे म्हटले जात होते. जड उपकरणे वाहून नेण्याच्या क्षमतेमुळे अवकाश शास्त्रज्ञ त्याला 'फॅट बॉय' असेही संबोधतात. सर्व काही ठीक राहिल्यास ऑगस्टच्या अखेरीस चांद्रयान- 3 चंद्रावर उतरेल.
भारताच्या या तिसर्या चंद्र मोहिमेतही अवकाश शास्त्रज्ञांनी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडरचे 'सॉफ्ट लँडिंग' करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 'चांद्रयान-2' मोहिमेदरम्यान, शेवटच्या क्षणी, लँडर 'विक्रम' मार्गाच्या विचलनामुळे 'सॉफ्ट लँडिंग' करू शकले नाही. ही मोहीम यशस्वी झाल्यास भारताचा अमेरिका, चीन आणि माजी सोव्हिएत युनियनसारख्या देशांच्या यादीत समावेश होईल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.