UP Accident Saam Digital
देश विदेश

UP Accident : आगरा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, केसर पान मसाला कंपनीच्या मालकाची पत्नी जागीच ठार

Kesar Pan Masala Owner Wife : उत्तर प्रदेशातील आग्रा लखनौ एक्सप्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातात कानपूरच्या प्रसिद्ध केसर पान मसाला कंपनीचे मालक हरीश माखिजा यांची पत्नी प्रीती माखिजा यांचा मृत्यू झाला आहे.

Sandeep Gawade

कानपूरच्या प्रसिद्ध केसर पान मसाला कंपनीचे मालक हरीश माखिजा यांची पत्नी प्रीती माखिजा यांचा उत्तर प्रदेशातील आग्रा लखनौ एक्सप्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्यासर मद्य व्यावसायिक तिलक राज शर्मा यांची पत्नी आणि कार चालक गंभीर जखमी झाले आहेत. हरीश मखिजा, त्यांची पत्नी, तिलक राज शर्मा आणि दीपक कोथरी एका खासगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वेगवेगळ्या वाहनांमधू कानपूरहून आग्र्याला जात असताना ही दुर्घटना घडली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा-लखनऊ एक्स्प्रेवेवर करहलनजीक कारचा टायर फुटला आणि कार उलटून दुभाजकाला धडकली. घटनेची माहिती मिळताच उपेडा रुग्णवाहिका आणि कर्मचाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.जखमींना सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी प्रीती माखिजा यांना मृत घोषित केलं. तर चालक आणि तिलक शर्मा यांच्या पत्नीला उपचारासाठी ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आग्रा-लखनौ-एक्स्प्रेस वेच्या 79 किलोमीटरवर कानपूरहून आग्राच्या दिशेने जाणारी कार अचानक टायर फुटल्यामुळे नियंत्रणाबाहेर गेली आणि दुभाजकाला धडकल्यानंतर उलटली. या अपघातात प्रीती माखिजा गाडीतून खाली पडल्या. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. कारमधील अन्य दोन जण जखमी झाले आहेत.UPEDA रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि जखमींना उत्तर प्रदेश वैद्यकीय विज्ञान विद्यापीठाच्या आपत्कालीन ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केलं, जिथे तपासणीनंतर डॉक्टरांनी प्रीती माखिजा यांना मृत घोषित करण्यात आलं. दीप्ती कोठारी आणि माखिजाचा चालक अनुराग हे गंभीर जखमी झाले. त्याच्यासोबत कारमध्ये असलेली मद्य व्यावसायिकाची पत्नी थोडक्यात बचावली आहे.

नेमकं काय घडलं?

कानपूर के उद्योगपती केसर पान मसाला हरीश मखीजा, आरती लिकर इंडस्ट्रीज के मालिक तिलक राज शर्मा और दीपक कोठरी यांची पत्नी यांच्या कुटुंबातील लोक वेगवेगळ्या गाड्या घेऊन आग्रा येथे एका खास कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जात होते. शुक्रवारी सायंकाळी सुमारे ६ वाजता, मैनपुरी जिल्ह्याच्या करहल पोलीस स्टेशनच्या क्षेत्रातील मिठेपूर आगरा-लखनऊ एक्सप्रेस वेवरील चॅनल नंबर ७९ वर अचानक गाडीचा टायर फूटला आणि डिव्हायडरला धडकून पलटी झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट, धो धो पाऊस कोसळणार

Google मधील नोकरी सोडली, सलग तीनदा UPSC परीक्षेत अपयश; चौथ्या प्रयत्नात थेट पहिली रँक, IAS अनुदीप दुरीशेट्टी यांची Success Story

Saturday Horoscope : कष्टाचं फळ मिळणार, यश खेचून आणाल; ५ राशींच्या लोकांचे स्वप्न सत्यात उतरेल

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

SCROLL FOR NEXT