हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाचा प्रतिस्पर्धी भाजप असला तरी, अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्याचं कारण आहे निवडणुकांचं टायमिंग. हरियाणात विधानसभेच्या ९० जागांसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तसंच इंडिया आघाडीतील दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणुका लढत आहेत.
1990 नंतर हरियाणाच्या राजकारणात तीन पक्षांचे वर्चस्व राहिले आहे. भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्त लोकदल पक्षाची महत्त्वपूर्ण भूमिका होती. सध्या लोकदल आणि त्यातून फुटलेले पक्ष कमकूव झाले आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसला अपेक्षा होती की यावेळी भाजपविरोधात थेट सामना होईल, पण हरियाणात 'आप'ने सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आणि आता अरविंद केजरीवाल यांची जामिनावर सुटका झाल्याने काँग्रेसच्या आशांवर पाणी फिरण्याची शक्यता आहे.
हरियाणात मागील 10 वर्षांपासून भाजपचं सरकार आहे. सरकारविरुद्ध असलेली मत हे नेहमीच विरोधी पक्षाला मिळतात. सध्या काँग्रेस विरोधी पक्षाची भूमिका निभावत आहे, पण आता अरविंद केजरीवाल यांच्या प्रवेशामुळे 'आप' सुद्धा ताकदीने दावेदारी करणार आहे. त्यामुळे विरोधी मतांमध्ये विभाजन होऊ शकते. 2019 च्या निवडणुकीतही असाच प्रकार पहायला मिळाला होता. विरोधी मतं काँग्रेस आणि जेजेपीमध्ये विभागले गेली, ज्याचा थेट फायदा भाजपला झाला होता.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि 'आप' एकत्र लढले होते. काँग्रेसला 43.67 टक्के मते आणि 5 जागांवर विजय मिळाला होता. तर भाजपला 46.11 टक्के मते आणि 5 जागांवर विजय मिळाला होता. 'आप'ला एकही जागा मिळाली नाही, पण सुमारे 4 टक्के मतं मिळाली होती. विधानसभा मतदारसंघनिहाय पाहिल्यास 'आप'ला 4 जागांवर आघाडी होती, काँग्रेसला 42 आणि भाजपला 44 जागांवर आघाडी होती. 90 जागांच्या हरियाणा विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी 46 जागांची आवश्यकता असते.
सर्व 90 सीटांवर निवडणूक लढवण्याची तयारी: हरियाणात आम आदमी पार्टी (आप) पूर्ण 90 सीटांवर निवडणूक लढवत आहे. पार्टीच्या सर्व उमेदवारांनी नोंदणी केली आहे. सुरुवातीला आप फक्त 50 सीटावर लढण्याची तयारी करत होती, पण काँग्रेसशी चर्चा फिस्कटल्यानंतर पार्टीने सर्व सीटांवर उमेदवार उतरवले आहेत. पार्टीने काँग्रेसच्या 3 आणि भाजपच्या 5 बंडखोरांना तिकीट देऊन मैदानात उतरवले आहे. काँग्रेसच्या बंडखोरांमध्ये पटौदीतील प्रदीप जाटौली, रादौडमधील भीम सिंह राठी आणि जगधारीतील आदर्श पाल गुर्जर यांचा समावेश आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.