Maharashtra Politics : 'लक्षात ठेवा तुमचा आमदार झोपलेला नाही' : हर्षवर्धन पाटील यांच्या त्या वक्तव्यावर दत्तात्रय भरणे यांची बोचरी टीका

Datta Bharne Son Harshvardhan Patil : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आता मला शांत झोप लागते असं व्यक्तव्य केलं होतं. त्यावर इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी तुमचा आमदार झोपलेला नाही, अशी बोचरी टीका केली आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam Digital
Published On

इंदापूरकरांनो तुमचा आमदार कमी बोलतो, कमी जाहिरात करतो, फ्लेक्स कमी लावतो, व्हाट्सअप वर कमी येतो, मीडियामध्ये चॅनलवर कमी दिसतो, मात्र तुमचा आमदार झोपलेला नाही, असं म्हणत इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन यांच्यावर नाव न घेता बोचरी टीका केली आहे. इंदापूर शहरातील पंचायत समितीतील कार्यक्रमात ते बोलत होते. दत्तात्रय भरणे यांच्या या विधानामुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या 'मला शांत झोप लागते' या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर. राज्यात सुरू असलेल्या ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या कारवाईवरुन सूचक वक्तव्य केलं होतं. भाजपमध्ये आल्याने मस्त आणि निवांत आहे, शांत झोप लागते, सध्या आपली चौकशी नाही की ईडीची भीती नाही, असं वक्तव्य केलं होतं. यावरून दत्तात्रय भरणे यांनी नाव न घेता हर्षवर्धन पाटील यांना टोला लगावला आहे.

इंदापूरकरांनो तुमचा आमदार कमी बोलतो, कमी जाहिरात करतो, फ्लेक्स कमी लावतो, व्हाट्सअप वर कमी येतो, मीडियामध्ये चॅनलवर कमी दिसतो, मात्र तुमचा आमदार झोपलेला नाही, असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या बोलण्याचा रोख हर्षवर्धन पाटील यांच्यावर होता. त्यांचं नाव न घेता भरणे यांनी ही टीका केली आहे. काही दिवसांपूर्वीही त्यांनी इंदापूर तालुक्यात विकास कामे केल्यामुळे शांत झोप लागते असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांना डीवचलं होतं. यावर दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी बोचरी टीका केली होती.

Maharashtra Politics
मोठी बातमी! अजितदादांचं ठरलं, २५ उमेदवारांची नावं फायनल, कोण कोणत्या मतदारसंघातून लढणार?

या वक्तव्यावर सारवासारव करताना पाटील यांनी भाजपमध्ये गेल्यामुळे मला कशाची चिंता राहिलेली नाही. माझ्या बोलण्याचा आणि चौकशीचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा हर्षवर्धन पाटील यांनी केला होता. माझ्या मागे कोणत्याही प्रकारची चौकशी नाही, त्यामुळे मला शांत झोप लागते, असं वक्तव्य केलं होतं. दरम्यान दत्तात्रय भरणे यांच्या आजच्या टीकेवर हर्षवर्धन पाटील काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Maharashtra Politics
Artical 50 : CJI यांच्या गणपती पूजेत पोहोचले PM मोदी, का होत आहे आर्टिकल ५० ची चर्चा? वाचा सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com