Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पहिला डाव टाकला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं २५ उमेदवार ठरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीतील २५ उमेदवारांची नावे ठरली आहे. अजित पवार बारमातीमधूनच लढणार असल्याचं ठरल्याचे सुत्रांनी सांगितले.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या अंतर्गत बैठकीमध्ये २५ उमेदवारांची नावे फायनल करण्यात आली आहेत. त्या उमेदरांना तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले आहे.
महायुतीमध्ये जागाटावटपाची चर्चा सुरु आहे. पण त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसनं आपले २५ उमेदवार ठरवले आहेत. राष्ट्रवादीच्या अंतर्गत बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आलाय. महायुतीची चर्चा सुरु आहे मात्र तयारी असावी या दृष्टीने आतापासून कामला लागा असे सांगण्यात आले आहे. अजित पवार बारामतीमधूनच लढणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. अजित पवारांव्यतिरिक्त उमेदवार बारामतीत नसणार त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याची बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.
कोण असतील उमेदवार?
उदगीर : संजय बनसोडे
आंबेगाव : दिलीप वळसे-पाटिल
दिंडोरी : नरहरि झिरवळ
येवला : छगन भुजबळ
पुसद : इंद्रनील नाइक
वाई खंडाळा महाबळेश्वर : मकरंद आबा पाटिल
पिंपरी : अण्णा बनसोडे
परळी : धनंजय मुंडे
इंदापुर : दत्ता भरणे
रायगड : अदिति तटकरे
कळवण : नितिन पवार
मावळ : सुनील शेळके
अमळनेर : अनिल पाटिल
अहेरी : धर्मराव बाबा अत्राम
कागल : हसन मुश्रीफ
खेड : दिलीप मोहिते-पाटिल
अहमदनगर : संग्राम जगताप
जुन्नर : अतुल बेनके
वडगाव शेरी : सुनील टिंगरे
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.