Wayanad landslides :  Saam tv
देश विदेश

Wayanad landslides : केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनामुळे विध्वंस; ढिगाऱ्याखाली दबून ५० हून अधिक जणांनी गमावला जीव

Wayanad landslides Update : केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनामुळे विध्वंस झाला आहे. ढिगाऱ्याखाली दबून ५० हून अधिक जणांनी गमावला जीव गमावला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

वायनाड : केरळच्या वायनाडमधील काही गावात मुसळधार पावसामुळे भूस्खलनाची घटना घडली आहे. या भस्खलनात शेकडो लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. लोकांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. एनडीआरएफ आणि एअरफोर्सचं पथक घटनास्थळी मदतकार्याला पोहोचली आहे. वायनाड जिल्ह्याच्या मुंडक्काई, चुरमाला, अट्टामाला आणि नूलपुझा या गावात ही दुर्घटना घडली आहे.

केरळच्या आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी म्हटलं की, आरोग्य विभागाने जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. यात आपात्कालीन स्थितीत आरोग्य सुविधांचा लाभ घेता येईल. तसेच दोन हेल्पलाईन क्रमांकही जारी करण्यात आले आहेत. 8086010833 आणि 9656938689 हे दोन्ही हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. जिल्ह्यातील वैथिरी, कलपट्टा, मेप्पडी आणि मननथावाडी रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत.

वायनाडमधील चार गावांत झालेल्या भूस्खलनाच्या घटनेनंतर अग्निशमन दल आणि एनडीआरएफचं पथक घटनास्थळी तैनात करण्यात आलं आहे. १०० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती मिळत आहे. मुसळधार पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच या दुर्घटनेत नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे.

पंतप्रधान मोदी यांनी वायनाडमध्ये भूस्खलनामुळे जीव गमावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. तसेच या घटनेतील जखमींना ५० रुपये देण्याची घोषणा केली आहे.

घटनास्थळी सैन्य दल तैनात

या भीषण दुर्घटनेनंतर सैन दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. १२२ इन्फँट्री बटालियनच्या दोन तुकड्या आणि कन्नूरच्या डीएससी सेंटरच्या २ तुकड्यांचा समावेश आहे. मदतकार्यात मोठ्या संख्येने सैन्य दलातील जवान मदतीला धावले आहेत. मुसळधार पावसामुळे वायनाडमध्ये भूस्खलनाची घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर राष्ट्रीय आरोग्य मिशनने नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. तसेच हेल्पलाईन क्रमांकही जारीर केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Mahadev Munde Case : महादेव मुंडे हत्या प्रकरणात कुटुंबीय असमाधानी; जरांगे पाटलांची घेणार भेट

Maharashtra Live News Update: बीडमध्ये मराठा समाज बांधव आणि ओबीसी समाज बांधव आमने-सामने

Jio OTT Plans: स्वस्तात धमाल! जिओचे ३ स्वस्त OTT प्लॅन, फक्त १०० रुपयांत ९० दिवस एंटरटेनमेंट

Fighting Viral Video: कारमध्ये बसवून धू धू धुतलं, आधी मुलीनं मारलं; नंतर मित्रानेच ९० सेकंदात २६ वेळा तरुणाच्या कानशिलात लगावल्या| पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT