केरळमध्ये दिवसाढवळ्या RSS नेत्याची हत्या, 6 मारेकरी हत्या करून फरार! SaamTvNews
देश विदेश

केरळमध्ये दिवसाढवळ्या RSS नेत्याची हत्या, 6 मारेकरी हत्या करून फरार!

शुक्रवारी इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या स्थानिक नेत्याची हत्या करण्यात आली होती. त्यांनतर आज RSS नेत्याची हत्या!

वृत्तसंस्था

पलक्कड : केरळमधील (Kerala) पलक्कड (Palakkad) जिल्ह्यात २४ तासांत दुसरी राजकीय हत्या झाली आहे. शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) पदाधिकारी एसके श्रीनिवासन यांची सहा जणांनी हत्या केली. 45 वर्षीय श्रीनिवासन यांच्या मोटारसायकल गॅरेजमध्ये सहा जणांनी पोहोचून त्यांची गळा आवळून हत्या केली. आरएसएस नेत्याच्या हत्येनंतर (Murder) स्थानिक दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली. (kerala rss leader shrinivasan hacked to death in palakkad)

हे देखील पहा :

स्थानिक टीव्ही चॅनेल्सवर चालवण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये (CCTV Footage) तीन मोटारसायकलवरून सहा जण श्रीनिवासन यांच्या दुकानात पोहोचले आणि तिघांनी त्यांच्यावर हल्ला केला. पोलीस (Police) आरोपीच्या शोधात परिसरात छापेमारी करत आहेत. याच भागात शुक्रवारी इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या स्थानिक नेत्याची हत्या करण्यात आली होती. त्यांनतर आज RSS नेत्याची हत्या हि दुसरी हत्या झाली. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP) विजय साखरे पलक्कड शहरात पोहचून २४ तासांत झालेल्या या दोन राजकीय हत्यांच्या तपासात समन्वय साधतील. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, "केरळ सशस्त्र पोलीस-1 (KAP-1) च्या तीन तुकड्यांना पलक्कड येथे जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत." सुरक्षा उपायांचा भाग म्हणून सशस्त्र पोलीस बटालियनचे सुमारे 270 सदस्य पलक्कडमध्ये तळ ठोकून असतील.

दरम्यान, आदल्या दिवशी झालेल्या पीएफआयचे नेते सुबैर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी शनिवारी चार आरएसएस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. शुक्रवारी दुपारी मशिदीत नमाज अदा करून घरी परतत असताना सुबैर (४३) यांची जिल्ह्यातील एलाप्पल्ली येथे हत्या करण्यात आली. येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर पीएफआय नेत्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) आणि PFI कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येने उपस्थितीत सुबैर यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले. आपल्या नेत्याच्या हत्येमागे आरएसएसचा हात असल्याचा आरोप पीएफआयने शुक्रवारी केला होता. आरएसएस नेत्यावर सूडबुद्धीने हल्ला झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: छगन भुजबळ तातडीने मुंबईला रवाना

Abhijeet Kelkar: 'धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला...' देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची जबरदस्त पोस्ट, म्हणाला...

Amravati Assembly Election 2024: बच्चू कडूंना पराभवाचा धक्का, अमरावतीच्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल एका क्लिकवर

Maharashtra Election Result: पुणेकरांची पसंती कोणाला? पुण्यातील २१ आमदार पाहा एका क्लिकवर

Maharashtra Election : 'इंजिन' धावलंच नाही! राज ठाकरेंच्या मनसेच्या पराभवाची कारणं काय?

SCROLL FOR NEXT