तब्बल 1 हजार तरुण-तरुणींनी वाजवला ढोल-ताशा, आवाजाने दुमदुमला गोदातीर, पहा Video
तब्बल 1 हजार तरुण-तरुणींनी वाजवला ढोल-ताशा, आवाजाने दुमदुमला गोदातीर, पहा VideoSaamTvNews

तब्बल 1 हजार तरुण-तरुणींनी वाजवला ढोल-ताशा, आवाजाने दुमदुमला गोदातीर, पहा Video

सर्वांचं आकर्षण असलेला 'ढोल-ताशा वादनाचा' महोत्सव या वर्षी हनुमान जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला होता.
Published on

नाशिक : नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमात शनिवारी भव्य महावादन (Mahavadan) नाशिकमध्ये (Nashik) पार पडले. सर्वांचे आकर्षण असलेला 'ढोल-ताशा वादनाचा महोत्सव' या वर्षी हनुमान जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला होता. भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या वनवासी वीर आणि स्वातंत्र्य सैनिकांना हे महावादन समर्पित करण्यात आले.

यात तब्बल 1 हजार तरुण-तरुणींनी सामूहिक ढोल ताशा (Dhol-Tasha) वादन सादर केले. 2016 पासून नववर्ष यात्रा स्वागत समितीतर्फे दरवर्षी महावादनाचा कार्यक्रम घेतला जातोय. यावर्षी या महावादनाचे हे ६ वे वर्ष आहे.

तब्बल 1 हजार तरुण-तरुणींनी वाजवला ढोल-ताशा, आवाजाने दुमदुमला गोदातीर, पहा Video
Pune : राज ठाकरेंच्या उपस्थितीत सामूहिक हनुमान चालीसा पठण, पहा Video

या महावादनामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व ढोल पथकांमध्ये प्रेम, बंधुभाव आणि एकोपा हि भावना निर्माण व्हावी या उद्देशाने यावर्षी सर्वांचा एकत्रित मिळून एकच “सुवर्ण कलश मंडित” भगवा ध्वज नाचवण्यात आला. या महावादनात १००० ढोल , २५० ताशे आणि १५०० वादक आणि झांज वादकांच्या सहभागातून लय-ताल आणि नाद यांची एकतानता साधली गेली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com