Keral Rickshaw Bus Accident Saamtv
देश विदेश

Kerala Road Accident: भाविकांवर काळाचा घाला! देवदर्शनाहून परतताना बस आणि रिक्षाची धडक; ५ जणांचा मृत्यू

Gangappa Pujari

Kerala Road Accident:

केरळमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. केरळच्या मल्लापूरम येथे प्रवाशांनी भरलेली रिक्षा आणि बसमध्ये जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी (१५, डिसेंबर) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील चेतियांगडी भागात शुक्रवारी रात्री भीषण अपघात (Accident) झाला. प्रसिद्ध सबरीमालाचे दर्शन घेऊन काही भाविक परतत होते. यावेळी चेटियांगड्डी येथे मंजेरी-एरिकोड मार्गावर भाविकांनी भरलेली बस आणि रिक्षाची जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच घरातील चौंघाचा समावेश आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. ही धडक इतकी जोरदार होती की ऑटो रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. अपघातातील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, रस्ता खराब असल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात देत आहे. मृतांमध्ये सबीरा, मोहम्मद निशाद, आशा फातिमा, मोहम्मद आसन आणि रेहान यांचा समावेश आहे. दुर्दैवी अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

PM Modi Speech: 'काँग्रेसने एससी, एसटी ओबीसींना जाणूनबुजून मागे ठेवलं', PM मोदींचा मोठा आरोप; मविआवरही जोरदार टीकास्त्र| पाहा VIDEO

IAS, IPS अधिकाऱ्यांचा पगार किती? कोण घेतं सर्वाधिक मानधन? जाणून घ्या

Maharashtra News Live Updates: देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणजे काँग्रेसमधील शाही परिवार - मोदी

MHADA Lottery 2024: घरं 2030, अर्ज तब्बल 134344; किंमती कमी झाल्यानंतर लोकांचा कल वाढला!

SCROLL FOR NEXT