Kerala Crime News Saam Tv News
देश विदेश

Kerala 5 People Death Case: केरळ हादरले! एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद मृत्यू, घरामध्ये 'या' अवस्थेत आढळले मृतदेह

Kerala 5 people found hanging: या सर्वांनी सामूहिक आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

Priya More

Kerala Crime News: केरळमध्ये (Keral) मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये पती-पत्नी आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. या सर्वांचे मृतदेह घरामध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळले. या सर्वांनी सामूहिक आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पण त्यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली याचा तपास केरळ पोलिसांकडून (Keral Police) सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केरळच्या कन्नूर जिल्ह्यातल्या चेरुवथुर येथे मंगळारी रात्री उशिरा ही घटना घडली. एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत घरामध्ये आढळले. पती-पत्नी आणि तीन मुलांचे मृतदेह घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लटकलेल्या अवस्थेत आढळले. मृतांमध्ये दोन मुलं आणि एका मुलीचा समावेश आहे. शाजी वेम्पिरिन्जन, त्याची पत्नी श्रीजा, मुलगा सुरज आणि सुजीत, तर मुलगी सुरभी यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

सध्या या घटनेला सामूहिक आत्महत्या असल्याचे म्हटले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. स्थानिक पोलिसांनी सांगितले की, आम्ही हत्या आहे की आत्महत्या या दोन्ही बाजूने तपास करत आहोत. 16 मे रोजीच शाजी आणि श्रीजा यांचे दुसरे लग्न झाले होते. असा अंदाज लावला जात आहे की, या पती-पत्नीने आधी आपल्या मुलांची हत्या करुन नंतर त्यांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवले. त्यानंतर दोघांनी देखील गळफास लावून आत्महत्या केली असावी.

या तिन्ही मुलांचे मृतदेह घरातील पायऱ्यांजवळ मिळाले आहेत. तर या पती-पत्नीचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. ही सर्व मुलं शाजीची होती. श्रीजाचे हे पहिले लग्न होते. तर शाजीचे हे दुसरे लग्न होते. त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच श्रीजासोबत दुसरे लग्न केले होते. यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांनी दोघांना पोलिस ठाण्यात बोलावले होते. पण पोलीस ठाण्यात येण्यापूर्वीच श्रीजाने आम्ही आत्महत्या करत असल्याचे फोन करुन पोलिसांना सांगितले होते. पण पोलीस घटनास्थळी पोहचण्यापूर्वीच सर्वांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान श्रीच्या कुटुंबीयांनी तिच्या आणि शाजीच्या नात्याला तसंच लग्नाला विरोध होता. या घटनेचा पोलीस कसून तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bed Tea: सकाळी झोपेतून उठल्यावर बेड टी घेणे योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT