Shubman Gill Sister Threatened: शुभमन गिलच्या बहिणीला जीवे मारण्याची धमकी, महिला आयोगाने घेतली दखल; नेमकं प्रकरण काय?

Shahneel Gill Trolled on Social Media: या प्रकरणाची दखल आता दिल्ली महिला आयोगाने (Delhi Commission for Women) घेतली आहे.
Shubman Gill Sister Threatened
Shubman Gill Sister ThreatenedSaam Tv

Delhi News: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून (Gujarat Titans Vs Royal Challengers Bangalore) क्रिकेटर शुभमन गिलने (Shubman Gill ) शानदार शतक झळकावले. गुजरात टायटन्सविरुद्धच्या पराभवानंतर आरसीबीचा आयपीएलमधला प्रवास संपला. या सामन्यानंतर आरसीबीचे (RCB) चाहते खूपच खूपच नाराज झाले. या सामन्यानंतर शुभमन गिल चर्चेत आला. आरसीबी आयपीलमधून बाहेर पडल्यानंतर शुभमन गिल आणि त्याची बहीण शाहनील गिलला सोशल मीडियावर (Social Media) खूप ट्रोल केले जात आहे. या प्रकरणाची दखल आता दिल्ली महिला आयोगाने (Delhi Commission for Women) घेतली आहे.

Shubman Gill Sister Threatened
PM Modi News : भारतात येताच PM मोदींनी विरोधकांवर केला जोरदार प्रहार; ऑस्ट्रेलियातील राजकीय किस्सा सांगितला

शुभमन गिल आणि शाहनील गिल यांना सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जात आहे. ऐवढेच नाही तर त्यांना धमकी देखील दिली जात आहे. या ट्रोलर्सने तर मर्यादा ओलांडत शुभमन गिलच्या बहिणाला बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्याचसोबत त्यांनी सोशल मीडियावर अश्लिल कमेंट्स करत तिला ट्रोल केले आहे. शुभमन गिलच्या बहिणीला शिवीगाळ करणाऱ्या सोशल मीडिया पोस्टवर दिल्ली महिला आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे. बुधवारी दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली. या नोटीसमध्ये एफआयआर नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे.

आयोगाने नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, 'शुभमन गिलच्या बहिणीसाठी ट्विटर आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलेल्या पोस्ट अश्लील, धमक्या देणाऱ्या आणि अपमानजनक आहेत. तिला बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. जी गुन्हेगारी आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यावर त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे. दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी ही नोटीस ट्विटरवर शेअर केली आणि दिल्ली पोलिसांना 26 मे पर्यंत केलेल्या कारवाईची सविस्तर माहिती देण्यास सांगितले.

क्रिकेटर शुभमन गिलची बहीण शाहनील सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. तिचे इन्स्टाग्रामवर 1.10 लाख फॉलोअर्स आहेत. आयपीएलमध्ये, ती गुजरात टायटन्स संघाला पाठिंबा देते. ऐवढंच नाही तर ती सामन्यादरम्यान मैदानात देखील उपस्थित राहते. त्याठिकाणावरुन ती अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोंवर ट्रोलर्स सातत्याने अनेक अपमानास्पद आणि अश्लील कमेंट करत आहेत. ऐवढंच नाही तर आयपीएलमधील आरसीबीचा प्रवास संपुष्टात आणल्यामुळे युजर्सने शुभमन गिलला लक्ष्य केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com