2000 RS Note Exchange In Post Office: नो टेन्शन! आता पोस्टातसुद्धा जमा करु शकता 2000 रुपयांची नोट, पण त्यासाठी...

2000 RS Note Banned: 2000 च्या नोटा बँका आणि रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक कार्यालयात जमा केल्या जात आहेत.
2000 Notes Exchange Process
2000 Notes Exchange ProcessSaam Tv

2000 RS Note Ban: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय जारी झाल्यानंतर लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहेत. या 2000 रुपयांच्या नोटा बँकांमध्ये बदलून मिळत आहे. त्यासाठी आरबीआयने 30 सप्टेंबर 2023 पर्यंतची मुदत दिली आहे. महत्वाचे म्हणजे आता तुम्हाला या नोटा पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) सुद्धा जमा करता येणार आहे.

2000 Notes Exchange Process
Beed Farmer Death: मुलाच्या डोळ्यासमोर बापाचा करुण अंत, विहिर खोदण्यासाठी आणलेल्या जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट

तुम्ही एकतर 2000 रुपयांची नोट बदलू शकता किंवा तुम्ही पुढील 4 महिन्यांसाठी तुमच्या बँक खात्यात जमा करू शकता. 2000 च्या नोटा बँका आणि रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक कार्यालयात जमा केल्या जात आहेत. यापुढे तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्येही या नोटा जमा करता येणार आहेत. तुम्ही या नोटा फक्त जमा करु शकता त्या तुम्हाला बदलून मिळणार नाही. पोस्ट ऑफिसमध्येही मोठ्या प्रमाणात लोकांची खाती असल्याने याठिकाणी या नोटा बदलून मिळणार का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

2000 Notes Exchange Process
Sengol History: नव्या संसद भवनातलं सेंगोल काय आहे? हजारो वर्ष जुन्या प्रतिकाचं चोळ साम्राज्याशी आहे कनेक्शन, जाणून घ्या

रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, 2000 रुपयांची नोट फक्त बँका आणि आरबीआयच्या 19 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये बदलता येणार आहे. यामध्ये पोस्ट ऑफिसचा उल्लेख नाही. याचा अर्थ पोस्ट ऑफिसमध्ये नोट बदलण्याची सेवा उपलब्ध नाही. तुम्ही तुमच्या पोस्ट ऑफिस खात्यात 2000 रुपयांची नोट जमा करू शकता. कारण 2000 ची नोट कायदेशीर निविदा राहते. म्हणूनच ते घेण्यास कोणीही नकार देऊ शकत नाही. मात्र यासाठी ज्या पोस्ट ऑफिस खातेदाराने नोट जमा केली आहे. त्याच्या खात्याची केवायसी असणे आवश्यक आहे.

2000 Notes Exchange Process
New Parliament Inauguration Row : अहंकाराच्या विटांनी... संसद भवन उद्घाटन वादात राहुल गांधी यांचीही उडी

23 मे 2023 पासून 2000 रुपयांच्या नोटा बदलून देण्याची प्रक्रिया सुरु झाली. बँक शाखा आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक कार्यालयांनी 2000 रुपयांच्या नोटांची देवाणघेवाण सुरू केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या मर्यादेनुसार, एखादी व्यक्ती एकावेळी 20,000 रुपयांपर्यंतच्या नोटा बदलू शकते. या चलनात रक्कम जमा करण्याची मर्यादा नाही. ज्यांचे बँक खाते नाही ते देखील 2000 ची नोट बदलून घेऊ शकतात. नोटा बदलण्यासाठी बँक खाते आवश्यक नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन 2000 च्या 10 नोटा एकावेळी बदलून घेऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com