Beed Farmer Death: मुलाच्या डोळ्यासमोर बापाचा करुण अंत, विहिर खोदण्यासाठी आणलेल्या जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट

Gelatin Sticks Blast: विहिरीतील खडक फोडण्यासाठी ब्लॉस्टिंग करण्यासाठी जिलेटिनच्या कांड्या आणण्यात आल्या होत्या.
Beed Farmer Death
Beed Farmer DeathSaam Tv

विनोद जिरे, बीड

Beed News: बीडमधून (Beed) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विहिरीच्या खोदकामासाठी आणलेल्या जिलेटिनच्या कांड्याचा स्फोट होऊन एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुलाच्या डोळ्यासमोर बापाचा करुण अंत झाला. या स्फोटामध्ये दोघे जण जखमी झाले आहेत. बीडच्या राक्षसभुवन गावात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Beed Farmer Death
Jalgaon News: शालकाला फोन करत रेल्‍वेखाली मारली उडी; शेतीच्‍या वाटणीवरून भावांमध्‍ये होता वाद

मिळालेल्या माहितीनुसार, आप्पासाहेब मस्के (35 वर्षे) असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आप्पासाहेब मस्के यांच्या शेतात विहिर खोदण्याचे काम सुरु होते. मागील दोन दिवसांपासून हे काम बंद होते. विहिरीतील खडक फोडण्यासाठी ब्लॉस्टिंगसाठी आणलेल्या जिलेटिनच्या कांड्या विहिरीच्या बाजूलाच बांधावर झाकून ठेवण्यात आल्या होत्या. याची माहिती शेतकरी आप्पासाहेब मस्के यांना नव्हती.

Beed Farmer Death
Sangli Crime News : ट्रॅक्टर अंगावर घालून मुलानं बापाला जिवानीशी मारलं; गाव हळहळलं

आप्पासाहेब मस्के आज शेतातील बांध पेटवत होते. त्यावेळी जिलेटिनच्या कांड्या बांधाजवळ ठेवण्यात आल्या होत्या. बांध पेटवल्यानंतर ही आग जिलेटिनच्या कांड्यांपर्यंत पोहचली. यावेळी बाजूलाच काम करत असलेल्या त्यांच्या मुलाला जिलेटीन तिथे ठेवल्याची माहिती होती. त्यामुळे तो वडीलांना तिथे ठेवलेल्या जिलेटीनच्या कांड्यांची माहिती देण्यासाठी त्यांच्याकडे धावला गेला. पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होता.

जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट होऊन आप्पासाहेब मस्के यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा आणि बाजूला असलेला पोकलेन ऑपरेटर जखमी झाला आहे. जखमींवर बीडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुलाच्या डोळ्यासमोरच वडिलांचा करुण अंत झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. आप्पासाहेब मस्के यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com