Kazakhstan Crash Investigation Updates Saam Tv
देश विदेश

Kazakhstan Plane Crash: माझं चुकलं! रशियाच्या मिसाईलमुळे विमान कोसळलं,पुतीन यांची कबुली

Kazakhstan Crash Investigation Updates: कझाकिस्तान विमान अपघात प्रकरणात रशियाने आपली चूक मान्य केलीय. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही याबद्दल माफी मागितलीय.

Bharat Jadhav

विमान J2-8243 बुधवारी कझाकस्तानमधील अकताऊ येथे क्रॅश झालं. त्यावेळी युक्रेनकडून ड्रोन हल्ला केला जात होता. या हल्ल्यांना रशिया प्रत्युत्तर देत होते. याचदरम्यान विमानावर हल्ला झाला आणि कोसळलं. दुर्घटनेनंतर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये विमानावर लहान-लहान छिद्रे असल्याचे दिसून आले. हे कदाचित क्षेपणास्त्राच्या तुकड्यांमुळे झाले असावे असं म्हटलं जात आहे.

दरम्यान या विमान दुर्घटनेत दोन पायलट आणि क्रू मेंबर्ससह ३८ जणांचा मृत्यू झालाय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी कझाकिस्तान विमान अपघाताबद्दल माफी मागितलीय. ही घटना खरंच दु:खद आहे. एअर डिफेंस त्यावेळी युक्रेनच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत होते. त्यातवेळी हा अपघात झाला असल्याचं राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी सांगितलंय. जेव्हा हा अपघात झाला.

यापूर्वी अझरबैजानचे अध्यक्ष इल्हाम अलीयेव यांनी पुतीन यांना रशियाच्या हवाई क्षेत्रात बाह्य हस्तक्षेप झाल्याचं सांगितले होतं. त्यानंतर विमानाचे नियंत्रण सुटले आणि अकताऊच्या दिशेने वळावे लागले.

युक्रेनला दोष देण्याचा रशियाचा प्रयत्न

अझरबैजान एअरलाइन्सकडून विमान दुर्घटनेनंतर सर्व्हे करण्यात आला. त्या रिपोर्टनुसार, रशियाच्या एअर डिफेंसने चुकून विमानावर हल्ला केला. हा हल्ला जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र यंत्रणेतून करण्यात आला होता. आता रशियाने हे आरोप मान्य केले आहेत. याआधी रशियाने युक्रेनला दोष देण्याचा प्रयत्न केला होता. युक्रेनने आरोप फेटाळून लावत चौकशीची मागणी केली होती.

पुतीन यांनी एक निवेदनातून मागितली माफी

पुतीन यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, "राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी या दुःखद घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केलीय. पुन्हा एकदा मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केलाय. जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्यात. या निवेदनात रशियाने म्हटले आहे की, "त्यावेळी, युक्रेनने ग्रोझनी, मोझडोक आणि व्लादिकाव्काझ भागात ड्रोन हल्ले केले होते, ज्याला हवाई संरक्षण प्रत्युत्तर देत होते."

अजरबैझानने पुतीन यांना सांगितलं होतं कारण

अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव यांनी नमूद केलं की, रशियन हवाई क्षेत्रात विमानात बाह्य भौतिक आणि तांत्रिक हस्तक्षेप होता. त्यामुळे विमानाचे नियंत्रण सुटले आणि नंतर कझाकिस्तानच्या अकताऊ शहराकडे वळावे लागले.” रशियन डिफेन्सने विमानाला ग्रोझनी विमानतळावर उतरण्यापासून रोखले होतं, असाही दावा राष्ट्राध्यक्ष इल्हामकडून करण्यात आला होता.

तसेच विमानाने दोनदा ग्रोझनी विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न केला, पण ते अयशस्वी ठरले. विमान अकताऊ विमानतळावर उतरले तोपर्यंत खूप उशीर झाला होता. विमान दुर्घटनेचे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, अनियंत्रित विमान थेट धावपट्टी रनवेवर आदळले. आणि आग लागली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT