Kazakhstan Mine Fire: कझाकिस्तानमधील खाणीत लागली भीषण आग; ३२ जणांचा मृत्यू, १८ जण बेपत्ता

Mine Fire: कोस्ट्येंको खाणीत शनिवारी आग लागल्याची घटना घडली.
ilkha.com
ilkha.comMine fire
Published On

Kazakhstan Mine Fire:

कझाकिस्तानमधील आर्सेलर मित्तल या जागतिक पोलाद कंपनीच्या खाणीत भीषण आग लागल्याची घटना घडलीय. यात ३२ जणांचा मृत्यू झालाय. सरकारला कंपनीसोबतचे गुंतवणूक सहकार्य संपवण्याचे आदेश द्यावे लागले. आपत्कालीन स्थिती मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोस्ट्येंको खाणीत शनिवारी सांयकाळी ४ वाजता आग लागल्याची घटना घडली. (Latest News)

यात ३२ जणांचा मृत्यू झालाय, तर १८ जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे.आग लागल्याची घटना घडल्यानंतर तेथील सरकारने कंपनीसोबतचे गुंतवणूक करार रद्द केले आहेत.मागली दोन महिन्यात कझाकिस्तानमधील आर्सेलरमित्तल साईटवर दुसऱ्यांदा आग लागल्याची घटना घडलीय. याआधी ऑगस्टमध्ये याच परिसरातील एका खाणीत झालेल्या दुर्घटनेत पाच खाण कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी राष्ट्रपती टोकायेव यांनी आर्सेलरमित्तल मधील गुंतवणूक करार रद्द करण्याचे आदेश दिले होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खाणीला आग का लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सरकारचे आपत्कालीन मंत्री सिरिम शारीपखानोव यांनी सांगितले की, या अपघातामागील कारण तपासले जात आहे. ही कंपनी लक्झेंबर्ग येथील पोलाद निर्माती कंपनीचं स्थानिक युनिट आहे. दरम्यान आग लागल्याची घटना घडल्यानंतर सरकारने कंपनीवर तीव्र संताप व्यक्त केलाय.

कझाकिस्तानचे राष्ट्रपती कासिम-जोमार्ट टोकायेव म्हणाले की, आर्सेलर मित्तल स्टील कंपनी ही आतापर्यतच्या इतिहासातील सर्वात खराब कंपनी आहे. याचबरोबर राष्ट्रपती टोकायेव यांनी पीडित कुटुंबियांचे सात्वंन करत २९ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय शोक दिवस जाहीर घोषित केलाय. दरम्यान राष्ट्रपती टोकायेव यांनी मंत्रिमंडळाला आर्सेलर मित्तल तेमिरटॉसोबतचे गुंतवणूक करार रद्द करण्याचे आदेश दिलेत.

खाणीचे ऑपरेटर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिथेनचा विस्फोट झाल्यानंतर खाणीतून २५२ ते २०६ लोकांना बाहेर काढण्यात आले. यातील १८ जण गंभीररित्या जखमी आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, दुपारी तीन वाजेपर्यंत बेपत्ता असलेल्या १८ जणांचा शोध लागला नव्हता.

ilkha.com
Israel-Hamas War: इस्रायल-हमासमधील युद्ध थांबावं; संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सभेत प्रस्ताव पास, भारताची भूमिका काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com