Kazakhstan plane crash : विमानात रांगणारे प्रवासी अन् मृतदेहांचा खच; काळीज चिरून टाकणारा VIDEO पाहा

Kazakhstan Plane Crash Video: कझाकिस्तानमध्ये बुधवारी एका प्रवासी विमानाचा अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की, यात ३८ प्रवाशांचा मृत्यू झाला.
Kazakhstan plane crash
Kazakhstan plane crashSaam Tv News
Published On

कझाकिस्तानमध्ये बुधवारी एका प्रवासी विमानाचा अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की, यात ३८ प्रवाशांचा मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाले आहेत. अशातच आणखीन एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये केबिनच्या आतमधील भीषण दृश्य दिसत आहे. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी प्रवासी जीव मुठीत घेऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर काही प्रवासी जमिनीवर रांगताना दिसत आहे. सध्या या भयंकर घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल होत आहे.

कझाकिस्तानमध्ये रशियाला जाणारं अजरबैजान एअरलाइन्सचं प्रवासी विमान क्रॅश झालं. या भीषण अपघातात ३८ जणांचा मृत्यू झाला, तर २९ प्रवाशांचे प्राण बचावले. भीषण अपघात घडल्यानंतर एका प्रवाशानं विमानच्या केबिनमधील व्हिडिओ रेकॉर्ड केलाय. केबिनमधील खराब स्थिती या व्हिडिओद्वारे पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये प्रवासी जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यात सीट्स तुटलेल्या दिसत आहेत. तसेच सामान सर्वत्र विखरून पसरलेलं आहे.

Kazakhstan plane crash
Kazakhstan Plane Crash : 42 जणांचा मृत्यू, कझाकिस्तानमध्ये विमान कोसळले, भयावह व्हिडीओ व्हायरल

दुसऱ्या व्हिडिओमध्ये विमानाला लागलेली आग विझवण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. आग विझवल्यानंतर काही प्रवासी बाहेर पडताना दिसत आहेत. तसेच बचाव पथक विमानात अडकलेल्या इतर प्रवाशांना बाहेर काढताना दिसत आहेत. यामध्ये प्रवासी पूर्णपणे घाबरलेले असून, जीव मुठीत घेऊन बाहेर पडताना दिसत आहेत.

Kazakhstan plane crash
Kazakhstan Mine Fire: कझाकिस्तानमधील खाणीत लागली भीषण आग; ३२ जणांचा मृत्यू, १८ जण बेपत्ता

अपघात घडला कसा?

अझरबैजान एअरलाइन्सच्या फ्लाइट एम्ब्रेयर E190AR नं बाकू एअरपोर्टवरून स्थानिक वेळेनुसार सकाळी ६.२८ ला उड्डाण केलं. उड्डाणानंतर तासाभरानंतर रशियाच्या चेचन्या ग्रोन्जी विमानतळावर लँड करणार होतं. मात्र त्यापूर्वी विमानाची एका पक्षासोबत धडक झाली. नंतर इमर्जन्सी लँडींग करण्यात येणार होतं.

मात्र, लँड होण्यापूर्वीच हा भीषण अपघात घडला. लँडींगदरम्यान विमानाला आग लागली आणि विमानाचे दोन तुकडे झाले. विमानात एकूण ६७ प्रवासी होते. त्यापैकी ३८ जणांचा मृत्यू तर, काही प्रवासी बचावले. तसेच या अपघातात दोन पायलटसह विमानातील पाच क्रू मेंबर्सच देखील मृत्यू झाला. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com