Karnataka Elections 2023 Saam Tv
देश विदेश

Karnataka Elections 2023: कर्नाटकात आज प्रचाराची रणधुमाळी; नरेंद्र मोदींचा बेंगळुरूमध्ये रोड-शो, सोनिया गांधी यांची हुबळीमध्ये प्रचारसभा

Shivani Tichkule

Karnataka Assembly Elections 2023: कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचार आता अंतिम टप्प्यात पोचला असून सर्वच राजकीय पक्षाच्या प्रचाराला वेग आला आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा प्रचारासाठी रिंगणात उतरणार आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही काँग्रेसच्या बाजूने जोरदार प्रचार करणार आहेत. एकूणच आज कर्नाटकात निवडणुकीच्या अनेक जाहीर सभा पाहायला मिळणार आहेत. (Latest Marathi News)

कर्नाटक (Karnataka) निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) बेंगळुरूमध्ये ३६ किलोमीटर लांबीचा रोड शो करणार आहेत . पीएम मोदींचा हा मेगा रोड शो दोन भागात विभागला गेला आहे. यापैकी एक म्हणजे 26 किमी लांबीचा रोड शो आदल्या काल (6 मे) करण्यात आला आहे. त्याचवेळी, आज (7 मे) दुसरा 10 किमी लांबीचा रोड शो होणार आहे. रोड शोनंतर पंतप्रधान शिवमोग्गा आणि म्हैसूर येथे दोन जाहीर सभा घेणार आहेत. (Political News)

सोनिया गांधीही निवडणुकीच्या प्रचारात

भाजपच्या (BJP) वतीने पंतप्रधान राजधानी बेंगळुरूमध्ये असतील, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेलगावी आणि इतर भागात असतील. शाह येथे एकूण 4 रोड शो आणि जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसही प्रचारात मागे नाही.

काँग्रेसच्या वतीने, पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) आज बेंगळुरूमध्ये असतील, जिथे ते दोन ठिकाणी कॉर्नर सभा घेणार आहेत आणि प्रियंका गांधींसोबत रोड शो सहभागी होणार आहेत. याशिवाय प्रियांका दोन रोड शो आणि दोन जाहीर सभाही करणार आहेत.

एका टप्प्यात होणार मतदान

कर्नाटक राज्यातील 224 विधानसभा मतदारसंघात 5,21,73,579 नोंदणीकृत मतदार आहेत. राज्यभरात 58,282 मतदान केंद्रे उभारणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली. कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 24 मे रोजी संपत आहे. त्याआधी कर्नाटकात 10 मे रोजी एकूण 224 जागांसाठी मतदार पार पडणार आहे. तर 13 मे रोजी निकाल लागणार आहे. सत्तेत येणाऱ्या पक्षाकडे 113 आमदारांचं संख्याबळ असणं गरजेचं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

SCROLL FOR NEXT