Pune Rain Update: पुण्यात सकाळपासूनच पावसाची संततधार; शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

आज सकाळपासूनच पुण्यात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. शहरातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला.
Rain News
Rain NewsSaam TV

Pune Weather Update: राज्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात वादळी वाऱ्यासह गारपिठांचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जरी करण्यात आला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याचाही समावेश आहे. दरम्यान, आज सकाळपासूनच पुण्यात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. शहरातील अनेक भागात  जोरदार पाऊस झाला. (Latest Marathi News)

Rain News
Wrestlers Protest: कुस्तीपटूंना खापचा पाठिंबा, आज शेतकरी नेते जंतरमंतरवर जमणार, सुरक्षा वाढवली

दरम्यान, पुण्यात (Pune) काल (ता.7) संध्याकाकाळी देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाने पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात हजेरी लावली. आकाश मुख्यतः ढगाळ असून शहर व उपनगरात अनेक ठिकाणी हलक्या सरीना पहाटेपासूनच सुरवात झाली आहे.

राज्यात यंदा हवामानाचा विचित्र खेळ पाहायला मिळत आहे. कधी कडक ऊन, तर कधी अवकाळी पावसासह (Rain) गारपिटीचा तडाखा बसत असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उष्णतेने कहर केला आहे. (Weather Update)

पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे तर दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा धोका कायम आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

Rain News
Supriya Sule: सुप्रिया सुळे लोकसभेत १ नंबर! संसदेत ठरल्या सर्वोत्कृष्ट खासदार...

वादळी पावसाचा इशारा देत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची (Farmer) चिंता वाढली आहे.

पावसामुळे उष्णता कमी झाल्यामुळे वातावरण थंड झाले आहे. तर मागच्या काही दिवसांपासून विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाने हजेरी लावली. तर राज्यातील काही ठिकाणी जोरदार गारपिटीमुळे मोठे नुकसान झालं आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com