Wrestlers Protest
Wrestlers ProtestSaam Tv

Wrestlers Protest: कुस्तीपटूंना खापचा पाठिंबा, आज शेतकरी नेते जंतरमंतरवर जमणार, सुरक्षा वाढवली

खाप नेते आज जंतरमंतरवर कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ जमणार आहेत. कुस्तीपटू ब्रिजभूषण शरण सिंहच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत.
Published on

Wrestlers Protest: कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ खाप नेते आज जंतरमंतरवर पोहोचणार आहे. हजारो शेतकरी आंदोलक पैलवानांची भेट घेणार असल्याचे खाप नेत्यांनी जाहीर केले आहे.

नरेश टिकैत, भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत हे देखील आज जंतरमंतरवर पोहोचणार आहेत. सायंकाळी ७ वाजता खाप नेते पैलवानांसह कँडल मार्चही काढणार आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवर कडक बंदोबस्त ठेवला आहे. (Latest Marathi News)

Wrestlers Protest
Supriya Sule: सुप्रिया सुळे लोकसभेत १ नंबर! संसदेत ठरल्या सर्वोत्कृष्ट खासदार...

अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात

जंतरमंतरजवळील भागात बॅरिकेडिंग करण्यात येणार असून अतिरिक्त पोलीस (Police) बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यासोबतच दिल्लीच्या (Delhi) सीमावर्ती भागात सुरक्षा तपासणी आणि गस्त वाढवण्यात येणार आहे.

दिल्ली सीमेवर वाहनांची तपासणी केली जाईल

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कायद्याचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ताब्यात घेतले जाईल. सीमेवर वाहनांची तपासणी केली जाईल आणि त्यात तंबू किंवा अशी कोणतीही वस्तू आढळल्यास ती जप्त केली जाईल. महिला पोलिसही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात येणार आहेत. (Delhi News)

Wrestlers Protest
Buldhana Accident: भरधाव दुचाकी एका कारला धडकून दुसऱ्या कारवर आदळली; विचित्र अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू

पैलवानांच्या समर्थनार्थ देशव्यापी संप

रविवारी पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या संयुक्त किसान मोर्चाशी संबंधित हजारो शेतकरी नेते जंतरमंतरवर पोहोचतील आणि कुस्तीपटूंना पाठिंबा देणार आहेत. महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना तातडीने अटक करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

यासोबतच शेतकरी संघटनेने पैलवानांच्या समर्थनार्थ देशव्यापी निदर्शने करण्याचेही नियोजन केले आहे. कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यावर एफआयआर दाखल झाला आहे, मग त्यांना अटक का केली जात नाही असा सवाल खाप नेत्यांनी विचारला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com