Kangana Ranaut reacts to viral fake wedding rumor involving Rahul Gandhi 
देश विदेश

कंगना रणौत-राहुल गांधींच्या लग्नाची पोस्ट खरी की खोटी? सोशल मीडियावर चर्चा, अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर

Kangana Ranaut Rahul Gandhi wedding rumors : राहुल गांधी आणि कंगना रणौत यांच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. यावर स्वत: खासदार कंगना रणौत यांनी स्पष्टीकऱण दिले आहे. नेमकं सत्य काय आहे? अफवा खऱ्या आहेत की खोट्या?

Namdeo Kumbhar

Kangana Ranaut Rahul Gandhi wedding viral News : बॉलिवूडची क्वीन आणि भाजप खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut marriage) सध्या राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या चर्चेमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर कंगना रणौत आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi marriage) यांच्या लग्नाची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. 'जर राहुल गांधींनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर मी त्यांच्याशी लग्न करेन', असे विधान कंगना यांनीे केल्याचा दावा व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आला आहे. या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पण, या व्हायरल दाव्यामागचं नेमकं सत्य काय आहे? कंगना यांनी खरोखरच असं विधान केलं आहे की ही केवळ अफवा आहे? कंगना रणौत यांनी यावर स्वत: स्पष्टीकरण दिले. नेमकं व्हायरल पोस्टमागील सत्य काय जाणून घेऊयात...(Kangana Ranaut clears rumours about agreeing to marry Rahul Gandhi: ‘Shame on those spreading fake news’ )

कंगना-राहुल यांच्या लग्नाचं नेमकं सत्य काय ?

कंगना रणौत आणि राहुल गांधी यांच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली पोस्ट पूर्णपणे फेक (बनावट) आहे. कंगना रणौत यांनी स्वतः या अफवांचे खंडन केले आहे. त्याशिवाय अशा बातम्या पसरवणाऱ्यांवर कडक शब्दांत टीका केली आहे. कंगना रणौत यांनी इंस्ट्रग्रामस्टोरीवर व्हायरल मेसेजची पोस्ट शेअर करत अफवा आणि खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना चांगलेच झापलेय.

Kangana Ranaut Rahul Gandhi wedding rumors

कंगना रणौत यांनी असे कोणतेही विधान कोणत्याही मुलाखतीत किंवा सार्वजनिक कार्यक्रमात केलेले नाही. ही पोस्ट एका मीम पेजने फक्त गंमत किंवा खोडसाळपणा म्हणून तयार केली होती. ती नंतर खरी मानून शेअर केली गेली.

कंगना-राहुल यांच्या लग्नाचं नेमकं प्रकरण काय?

एका 'मीम' पेजवरून राहुल आणि गांधी आणि कंगना रणौत यांच्या लग्नाची एक पोस्ट व्हायरल झाली होती. जर राहुल गांधी भाजपमध्ये प्रवेश करणार असतील, तर मी त्यांच्याशी लग्न करायला तयार आहे, असे कंगना रणौत म्हटल्याचा दावा या व्हायरल पोस्टमध्ये केला होता. या विधानामुळे सोशल मीडियावर तर्क-वितर्कांना उधाण आले. राजकीय वर्तुळातही याची जोरदार चर्चा सुरू झाली होती.

कंगना रणौत यांनी काय म्हटले ?

लग्नाची ती पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंगना यांनीे इंस्टाग्राम स्टोरीवरून तीव्र संताप व्यक्त केला. हे विधान पूर्णपणे खोटं आणि निराधार असल्याचे त्यांनी सांगितले. कंगना यांनी ही पोस्ट अत्यंत खालच्या दर्चाची असल्याचे म्हटले. संताप व्यक्त करताना कंगना यांनी म्हटले की, राजकारणात महिलांचा सन्मान राखला जात नाही, अशा अफवा पसरवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish - Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी' चे बॉक्स ऑफिसवर वादळ; रितेश देशमुखच्या ऐतिहासिक चित्रपटाची रविवारी बक्कळ कमाई, वाचा कलेक्शन

Maharashtra News Live Update: हिंगोलीत 48 वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू

Maharashtra Politics: काँग्रेसमध्ये चाललंय काय? ७० नगरसेवक अचानक संपर्काबाहेर, राज्यातील राजकारणात मोठी खळबळ

पुणे हादरले! बस स्टँडवर तरुणीसमोर माथेफिरूचे हस्तमैथुन; तरुणीने व्हिडिओ बनवला अन्...

PM Kisan Yojana: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता; तुमचे नाव तर नाही ना?

SCROLL FOR NEXT