Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना लॉटरी लागणार! एकाच वेळी खात्यात ४५०० जमा होणार; मार्च-एप्रिल हप्त्याची अपडेट

ladki bahin yojana march april installment date 2026 : लाडकी बहीण योजनेत ईकेवायसीनंतर महिलांच्या खात्यात ₹१५००, ₹३००० की ₹४५०० जमा होणार? जाणून घ्या
Ladki Bahin scheme ₹4500 update
Women beneficiaries await major payout update under Maharashtra’s Ladki Bahin Yojana Saam Tv
Published On

March April ladki bahin yojana installment date Update 2026 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांचा सन्मान निधी दिला जातो. (Ladki Bahin Yojana latest update) परंतु, ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया आणि पोटनिवडणुकांमुळे हप्ता रखडला होता. आता महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा मार्ग मोकळा झाला असून सरकार लाडक्या बहिणींना विशेष भेट देण्याच्या तयारीत आहे. लवकरच हा निधी खात्यात जमा होईल, अशी चिन्हे आहेत. मात्र, महिलांना नक्की किती हप्ते एकत्र मिळणार? यावरून सध्या चर्चा रंगली आहे.

फेब्रुवारी २०२६ मध्ये लाडक्या बहि‍णींच्या खात्यात शेवटचा १५०० रुपयांचा हप्ता जमा झाला होता. त्यानंतर अद्याप पुढील हप्ता मिळालेला नाही. काही महिलांच्या खात्यात जानेवारीपासून पैसे जमा झालेले नाहीत, त्यामुळे आपला अर्ज बाद झाला आहे का? अशी भीती त्यांना वाटत आहे. अशा महिलांना ५००० ते ६५०० रुपयांचा हप्ता एकत्र मिळणार असल्याचीही चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मार्च महिन्यापासूनचे थकीत हप्ते जमा करण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे.

Ladki Bahin scheme ₹4500 update
Ladki Bahin Yojana : ₹३००० की ₹१५००, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात किती पैसे येणार? मार्च-एप्रिलच्या हप्त्याची महत्त्वाची अपडेट

राज्यातील पात्र महिलांना मार्च महिन्यापासूनचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. ३० एप्रिल रोजी ई-केवायसीची मुदत संपल्यानंतर आता निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होईल. माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत ही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होऊन पुढील निर्णय घेतला जाईल.

Ladki Bahin scheme ₹4500 update
Ladki Bahin Yojana : किती महिलांच्या खात्यात ₹१५०० चा हप्ता खटाखट जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

महिलांच्या खात्यात ३००० रुपये येणार की ४५००, याबाबत साशंकता आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. मे महिना सुरू झाल्याने काही जणांच्या मते तीन महिन्यांचे मिळून ४५०० रुपये जमा होऊ शकतात. तर काही सूत्रांच्या मते, सध्या केवळ मार्च महिन्याचाच हप्ता जमा होईल. याबद्दलची अधिकृत अपडेट पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. (Ladki Bahin Yojana 4500 rupees installment update Maharashtra)

Ladki Bahin scheme ₹4500 update
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना सरकार मोठं गिफ्ट देणार, एकाचवेळी खात्यात खटाखट ₹४५०० येणार? वाचा अपडेट

३० एप्रिल रोजी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांनी अर्जांची पडताळणी केली. या प्रक्रियेनंतर राज्यातील सुमारे ५४ लाख महिलांचा या योजनेचा लाभ बंद झाला आहे. निकषात न बसणाऱ्या किंवा ई-केवायसी न केलेल्या या महिलांच्या खात्यात आता १५०० रुपये जमा होणार नाहीत. दुसरीकडे, १ कोटी ८९ लाख पात्र महिलांना हा लाभ मिळत राहणार आहे. अपात्र महिलांची संख्या कमी झाल्यामुळे सरकारचे सुमारे १२०० कोटी रुपये वाचणार असल्याचे समोर आले आहे.

Ladki Bahin scheme ₹4500 update
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! इतक्या महिला ठरल्या पात्र, पण यांचा ₹१५०० चा लाभ कायमचा बंद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com