Lok Sabha Election 2024 Saam Tv
देश विदेश

Lok Sabha Election 2024: कमल हसन यांच्या पक्षाची लोकसभा निवडणुकीतून एक्झिट, नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या

Kamal Haasan News: मक्कल निधी मय्यम पक्षाचे (MNM) प्रमुख कमल हसन यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Lok Sabha Election 2024:

मक्कल निधी मय्यम पक्षाचे (MNM) प्रमुख कमल हसन यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत कमल हसन यांचा पक्ष द्रविड मुनेत्र कळघम (AIADMK) पक्षाला समर्थन देणार आहे. या बदल्यात एमएनएमला राज्यसभेत (2025) एका जागेचे आश्वासन देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत बोलताना कमल हसन म्हणाले की, एमएनएम लोकसभा निवडणूक लढवणार नाही. लोकसभा निवडणुकीत द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीचा आम्ही प्रचार करणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, डीएमके 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, विदुथलाई चिरुथिगल काची (VCK) आणि मक्कल निधी मय्यम पेक्षासह इतर पक्षांसोबत युती करत आहे. द्रमुकने काँग्रेसला तामिळनाडूतून लोकसभेच्या 9 आणि पुद्दुचेरीतून 1 जागा दिल्याची चर्चा आहे. याबाबत दोन्ही पक्षांकडून लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.

याआधी द्रमुक आणि व्हीसीके पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर एकमत झाल्याचं सांगण्यात येत आहे. व्हीसीके चिदंबरम आणि विल्लुपुरम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हीसीकेला दोन जागा देण्यापूर्वी, डीएमकेने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) यांना प्रत्येकी दोन जागा आणि एमडीएमकेला एक जागा आधीच दिली आहे.  (Latest Marathi News)

जागावाटपावर सहमती होण्यापूर्वी चेन्नईतील द्रमुकच्या मुख्यालयात कमल हसन आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यात बैठक झाली. बैठकीनंतर कमल हसन म्हणाले की, मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही आणि लोकसभा निवडणुकीत द्रमुक आघाडीचा प्रचार करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत डीएमकेने युतीत निवडणूक लढवली होती. ज्यामध्ये पक्षाने तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या एकूण 39 पैकी 38 जागा जिंकल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: माढामध्ये शरद पवार गटाचे अभिजित पाटील यांचा विजय

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

VIDEO : महायुतीची मुसंडी, अमित शहांकडून फडणवीसांचं अभिनंदन | Marathi News

Kinshuk Vaidya : शुभ मंगल सावधान! 'शाका लाका बूम बूम' फेम संजूच्या डोक्यावर पडल्या अक्षता, गर्लफ्रेंडसोबत थाटला संसार

SCROLL FOR NEXT