Fact Check: 19 एप्रिलला मतदान आणि 22 मे रोजी निकाल? लोकसभा निवडणुकीसंदर्भातील पत्र व्हायरल, काय आहे सत्य?

Lok Sabha Elections 2024: सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये 19 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. मात्र हे खरं आहे का?
Lok Sabha Election Viral Letter
Lok Sabha Election Viral LetterSaam Tv
Published On

Lok Sabha Election Viral Letter:

संपूर्ण देशात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेससह अन्य पक्षांनी उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने यावेळी 400 हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

तर काँग्रेस आणि इतर पक्षही आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीचे मतदान एप्रिल किंवा मे महिन्यात होऊ शकते, अशी चर्चा आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये 19 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. मात्र हे खरं आहे का? निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत का? काय आहे या व्हायरल पत्रामागचं नेमकं सत्य, हे जाणून घेऊ... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Lok Sabha Election Viral Letter
Ayushman Card: आयुष्मान कार्डधारकांना कोणत्या रुग्णालयात मिळू शकतात मोफत उपचार? जाणून घ्या

व्हॉट्सॲपसह इतर सोशल मीडिया नेटवर्कवर व्हायरल होत असलेल्या या पत्रात 28 मार्चपासून लोकसभा निवडणूक 2024 साठी नामांकन सुरू होईल, असे म्हटले आहे. पत्रानुसार 19 एप्रिलला मतदान होणार आहे. 22 मे रोजी मतमोजणी सुरू होणार असून त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहेत. त्यानंतर 30 मे रोजी नवीन सरकार स्थापन होईल, असा दावा व्हायरल झालेल्या पत्रात करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

मात्र हे खरं नाही. हे फेक पत्र आहे. खुद्द निवडणूक आयोगाने याबाबत सत्य सांगितलं आहे. व्हॉट्सॲपवर व्हायरल होणारे हे पत्र फेक असल्याचे निवडणूक आयोगाने ट्विटरवर पोस्ट करत सांगितलं आहे.

Lok Sabha Election Viral Letter
LPG वर केंद्र सरकारची मोठी घोषणा, एका वर्षासाठी मिळणार 300 रुपयांची सूट; 9 कोटी महिलांना मिळणार लाभ

निवडणूक आयोगाने आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले आहे?

व्हायरल पत्राबद्दल पोस्ट करत निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, ''लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या वेळापत्रकाबाबत एक फेक पत्र व्हॉट्सॲपवर व्हायरल होत आहे. हा मेसेज फेक आहे. भारतीय निवडणूक आयोगाने अद्याप तारखा जाहीर केलेल्या नाहीत. निवडणुकीच्या तारखा जाहीर होईल, त्यावेळी आयोगाकडून पत्रकार परिषद बोलावली जाईल.'' त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखांचे व्हायरल झालेले पत्र फेक असल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणूक कधी होणार, किती टप्प्यात मतदान होणार? या प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसांत मिळतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com