Jyoti Malhotra Instagram
देश विदेश

जानेवारीमध्ये पहलगाम, मग पाकिस्तान...; Jyoti Malhotra च्या इंस्टाग्राम रीलमुळे धक्कादायक माहिती समोर

Jyoti Malhotra News : पाकिस्तानसाठी भारतामध्ये हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे. ज्योतीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Yash Shirke

YouTuber Jyoti Malhotra: हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पंजाबमधील मालेरकोटला आणि हरियाणा येथून ६ पाकिस्तानी हेरांना अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे.

पहलगाम हल्ला होण्याच्या तीन महिन्यांपूर्वी ज्योती मल्होत्रा श्रीनगरला ट्रिपवर गेली होती. तेव्हा तिने पहलगामला देखील भेट दिली होती. जानेवारीमध्ये श्रीनगर ट्रीपनंतर ज्योती मार्च महिन्यात पाकिस्तानला गेली. ज्योतीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शोध घेतल्यानंतर ही माहिती समोर आली. ज्योती पाकिस्तान उच्चायुक्तालयात काम करणाऱ्या दानिश नावाच्या अधिकाऱ्याच्या संपर्कात होती असा आरोप केला जात आहे. याच अधिकाऱ्याने ज्योतीला पाकिस्तानमध्ये पाठवले होते.

२०२३ मध्ये पाकिस्तान उच्चायुक्तालयात गेली असल्याचे ज्योती मल्होत्राने पोलीस चौकशीदरम्यान कबूल केले. पाकिस्तानला जाण्यासाठी ज्योतीला व्हिसाची गरज होती. तेव्हा तिची भेट अहसान-उर-रहीम उर्फ ​​दानिशशी झाली. यादरम्यान तिने दानिशचा फोन नंबर घेतला, त्यांचा संवाद सुरु झाला. त्यानंतर ज्योती दोनदा पाकिस्तानला गेली. दानिशच्या सल्ल्यानुसार तिथे अली अहवानला भेटली. त्याने ज्योतीची पाकिस्तानमध्ये राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था केली.

अली अहवानने ज्योतीची ओळख पाकिस्तानी सुरक्षा आणि गुप्तचर अधिकाऱ्यांशी करवून दिली. याच दरम्यान ज्योती शाकीर आणि राणा शाहबाज या दोन लोकांना भेटली. संशय येऊ नये म्हणून तिने शाकीरचा नंबर फोनमध्ये जाट रंधावा म्हणून सेव्ह केला. भारतात परतल्यानंतर ती स्नॅपचॅट, व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे या लोकांशी संपर्कात होती. ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात असल्याचे आढळून आले आहे.

पोलिसांनी शनिवारी (१७ मे) ज्योतीला न्यायालयात हजर केले. तिला पाच दिवसांच्या रिमांडवर ठेवण्यात आले आहे. १५ मे रोजी डीएसपी जितेंद्र कुमार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ज्योतीला तिच्या घरातून ताब्यात घेतले. तिच्या विरुद्ध हिसार सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेंट्रल एजन्सी ज्योतीची चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact News : पोषण आहारातील मिलेट न्यूट्रेटिव्ह बारचा पुरवठा थांबविला; चॉकलेटमध्ये निघाल्या होत्या अळ्या, पुरवठादाराला नोटीस

बाळ होत नाही म्हणून नीतू छांगुर बाबाला भेटली, नवऱ्यासोबत मिळून...; उत्तर प्रदेशमधील बाबाचं मुंबई कनेक्शन उघड

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात, फ्लायओव्हरच्या कड्याला दुचाकी जोरात धडकली; २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Cervical cancer: सर्व्हायकल कॅन्सरचं निदान होण्यास उशीर का होतो? काय आहेत कारणं?

Hair Mask : मेथीच्या दाण्यांच्या हेअर मास्कने केस गळती थांबवा

SCROLL FOR NEXT