DY Chandrachud new Chief Justice of India ANI
देश विदेश

DY Chandrachud : धनंजय चंद्रचूड देशाचे ५० वे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ

न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे.

साम टिव्ही ब्युरो

DY Chandrachud : न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. आज (९ ऑक्टोबर) राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. मावळते सरन्यायाधीश उदय लळित यांच्याकडून लवकरच चंद्रचूड हे पदभार स्वीकारतील. आगामी दोन वर्षे सरन्यायाधीश म्हणून ते न्यायदानाचे काम करतील.

न्यायमूर्ती चंद्रचूड यांना जून 1998 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केले होते आणि त्याच वर्षी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 29 मार्च 2000 ते 31 ऑक्टोबर 2013 या कालावधीत ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. चंद्रचूड यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1959 रोजी झाला.

धनंजय यशवंत चंद्रचूड असे त्यांचे पूर्ण नाव आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी दिल्ली विद्यापीठातून वकिलीचं शिक्षण घेतले आहे. यानंतर त्यांनी प्रतिष्ठित इनलॅक्स स्कॉलरशिपच्या मदतीने हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले. हार्वर्डमध्ये, त्यांनी लॉ इन मास्टर्स आणि फॉरेन्सिक सायन्स मध्ये डॉक्टरेट पूर्ण केली.

पुण्यातील कन्हेरसर हे चंद्रचूड यांचं मूळ गाव आहे.न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचे वडील न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड 1978 ते 1985 या काळात भारताचे सरन्यायाधीश होते. न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड तब्बल सात वर्षे चार महिने इतका सर्वाधिक काळ सरन्यायाधीशपदावर राहिले.

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड 29 मार्च ते 31 ऑक्टोबर 2013 या काळात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. त्यानंतर त्यांची नियुक्ती अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्याधीश म्हणून करण्यात आली होती. 2018 मध्ये धनंजय चंद्रचूड यांनी व्याभिचाराला गुन्हा मानणाऱ्या कायद्याला रद्द केलं होतं. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठानं निर्णय दिला, त्यापैकी एक चंद्रचूड होते.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सरन्यायाधीश भूषण गवईंविरुद्ध आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Police Constable Bharti: धक्कादायक! ७,५०० कॉन्स्टेबल पदासाठी १०,००,००० अर्ज; पीएचडी, इंजिनियर अन् पदवीधारकांकडून प्रयत्न

सांगलीत अजित पवारांचा नेता मोठा निर्णय घेणार, पक्षविरहित स्थानिक निवडणूक लढवणार

Dharashiv : गावाजवळील तलावात पोहण्यासाठी गेले; परराज्यातील दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Pune Zilla Parishad : जिल्हा परिषद सदस्य पदाकरिता आरक्षण सोडतीची तारीख ठरली, कधी आणि कुठे होणार कार्यक्रम?

SCROLL FOR NEXT