Police Recruitment : आनंदाची बातमी! राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू; आजपासून भरता येईल ऑनलाईन अर्ज

पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Police Recruitment
Police RecruitmentSAAM TV

Police Recruitment 2022 : पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आजपासून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. राज्यभरात तब्बल 18 हजार 331 जागांसाठी पोलीस भरती (Police Recruitment) होणार आहे. राज्याच्या गृहविभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. (police constable recruitment 2022 maharashtra)

Police Recruitment
Mumbai News : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वी पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. तशी जाहिरात राज्यातील अनेक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, काही कारणास्तव पोलीस भरतीला स्थगिती देण्यात आली. दरम्यान, आता पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आजपासून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

राज्यभरात तब्बल 18 हजार 331 जागांसाठी पोलीस भरती होणार असून यासाठी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेतले जाणार आहेत. यानंतर आधी शारीरीक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. (maharashtra police bharti 2022 physical test details)

Police Recruitment
Supreme Court : केंद्र सरकारला नोटाबंदी करण्याचा अधिकार आहे का? आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

विशेष बाब म्हणजे, कोरोना काळात ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीचा अर्ज भरला, अशा उमेदवारांना या भरतीत जागा मिळेल का, असा प्रश्न होता. गृहविभागाने या उमेदवारांकरिता मोठा निर्णय घेतला आहे. या उमेदवारांना पोलीस भरतीची संधी देण्याचा निरणय राज्य सरकारने घेतला आहे. म्हणजेच ज्यांची वयोमर्यादा समाप्त झाली आहे, अशा उमेदवारांना पोलीस भरतीत संधी मिळणार आहे.

कोरोना संकट काळात राज्याची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली होती. त्यामुळे या काळात राज्यात कोणतीही शासन भरती (Recruitment) करू नये असा आदेश काढण्यात आला होता. हा निर्णय आतापर्यंत लागू होता. मात्र, गेल्या आठवड्यात राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत ११ हजार ४४३ पोलीस पदांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. मध्यतरी स्थगिती मिळाल्यानंतर आजपासून पोलीस भरतीचे अर्ज सुरू झाले आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com