JNU ani
देश विदेश

JNU Election Results 2024 : 'जेएनयू'मध्ये डाव्यांचा दबदबा कायम; 'अभाविप'च्या उमेदवारांचा दारुण पराभव, कोणाला किती मते मिळाली?

JNU Election Results Update : चार पदांसाठी झालेल्या निवडणुकीत डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेचा दारूण पराभव केला आहे. तर 'बापसा' या विद्यार्थी संघटनेला महासचिव पद जिंकण्यास यश मिळालं आहे.

Vishal Gangurde

JNU Election :

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात झालेल्या विद्यार्थी निवडणुकीत पुन्हा एकदा डाव्या संघटनांनी विजयाचा झेंडा फडकावला आहे. चार पदांसाठी झालेल्या निवडणुकीत डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेचा दारूण पराभव केला आहे. तर 'बापसा' या विद्यार्थी संघटनेला महासचिव पद जिंकण्यास यश मिळालं आहे. (Latest Marathi News)

कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली?

अध्यक्ष पद

धनंजय (left)- 2598

उमेश चंद्र अजमीरा (ABVP)- 1676

विश्वजीत मिंजी (BAPSA)- 398

अभिजीत कुमार- 58

अफरोज आलम- 36

जुनैद रजा- 283

सार्थक नायक- 113

आराधना- 245

नोटा- 142

उपाध्यक्ष

अविजीत घोष (Left)- 2409

दीपिका शर्मा (ABVP)- 1482

मोहम्मद अनस ए. (BAPSA)- 861

अंकुर राय- 814

महासचिव

प्रियांशी आर्य (BAPSA, left Supported) - 2887

अर्जुन आनंद (ABVP) - 1961

फरीन जैदी - 436

नोटा- 197

संयुक्त सचिव

मो. साजिद (Left) - 2574

गोविंद दांगी (ABVP) - 2066

रूपक कुमार सिंह (BAPSA) - 539

नोटा- 353

विक्रमी मतदान

जवाहलाल नेहरू विद्यापीठात मागील चार वर्षात विद्यार्थी निवडणुका घेण्यात आल्या नव्हत्या. या चार वर्षानंतर घेण्यात आलेल्या निवडणुकीत एकूण ७३ टक्के विक्रमी मतदान झालं. गेल्या १२ वर्षातील सर्वाधिक मतदान आहे. विद्यापीठातील ७,७०० मतदारांहून अधिक जणांनी गुप्त मतदान केल.

अध्यक्षाच्या शर्यतीत होते ८ उमेदवार

मतदानादरम्यान, विद्यार्थ्यांनी 'जय भीम', 'भारत माता की जय', 'लाल सलाम'चे नारे लगावले. या निवडणुकीमुळे विद्यापीठाच्या संकुलातील राजकीय वातावरण तापलं होतं. जेएनयूएसयू केंद्रीय पॅनेलमधील पदांसाठी १९ उमेदवार आणि स्कूल काउंसलर्ससाठी ४२ उमेदवार रिंगणात होते. तर यापैकी निवडणुकीत ८ उमेदवार हे अध्यक्ष पदाच्या शर्यतीत होते.

दरम्यान, डाव्या विचारांच्या संघटनांमध्ये युनायटेड लेफ्टमध्ये AISA, SFI, AISF आणि DSF या संघटनाचा सामावेश होता. लेफ्ट युनायटेडने अध्यक्षपदासाठी धनंजय, उपाध्यक्षपदासाठी अविजीत घोष, संयुक्त सचिवपदासाठी मोहम्मद साजिदला मैदानात उतरवलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पाकिस्तानच्या ग्रुपवर चॅट करणाऱ्या नागपूरमधील दोघांची एटीएसकडून सखोल चौकशी

IND vs PAK : भारताला मोठा धक्का, पाकिस्तानविरोधात भिडण्याआधीच हुकमी एक्का दुखापतग्रस्त, सूर्याचं टेन्शन वाढलं

Pune DCM Ajit Pawar : पुण्यातील वाहतूककोंडी पाहायची आहे? मनोहर पर्रिकरांसारखे तुम्हीही शहरात फिरा, अजित पवारांना महिलेचा सल्ला

Moong Dal Dhokla Recipe : पचायला हलका अन् चवीला सुपरटेस्टी; रविवारी नाश्त्याला बनवा मूग डाळीचा ढोकळा

Shcoking: धक्कादायक! बहिणी मावशीच्या घरी निघाल्या, नराधमांनी दोघींवर जंगलात केला सामूहिक बलात्कार, भयानक कृत्यानंतर मोबाईल घेऊन पसार

SCROLL FOR NEXT