Siddhi Hande
दाढ दुखल्यावर काय करावे अन् काय करु नये हे सूचत नाही. दाढ दुखल्यावर हिरड्यांना तीव्र वेदना होतात.
दाढदुखीच्या वेदना या असह्य होणाऱ्या असतात. दाढदुखीवर तुम्ही घरच्या घरी उपाय करु शकतात.
दाढ दुखत असेल तर एका पिशवीत बर्फ घ्या. हा बर्फ ज्या भागात तुमचा दात दुखतोय तिथे लावा.
तुम्ही जो दात दुखतोय त्यावर लवंग ठेवा. लवंगमुळे दातातील किड मरण्यास मदत होते.
तुम्ही एका कापसाच्या गोळ्यावर लवंगाचे तेल लावून हिरड्यांवर किंवा दातावर लावा.
तुम्ही कोमट पाण्यात खूप मीठ टाका. हे मीठ पाणी तुमच्या दाताच्या तिथे ठेवा. हे मीठ तुमच्या वेदना कमी करण्यास मदत करेल.
तुमच्या दातावर आल्याचा रस किंवा अदरकदेखील ठेवू शकतात. यातील अँटीबॅक्टेरियम गुणधर्म दुखणे कमी करण्यास मदत करतील.
घरगुती उपाय करुनही जर दातदुखी थांबली नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
दिवसातून दोन ते तीन वेळा दात घासले पाहिजे जेणेकरुन त्यात कोणतीही किड राहणार नाही. दात स्वच्छ होतील.