Jharkhand Ranchi News SAAM TV
देश विदेश

हादरवणारी घटना; हरयाणानंतर झारखंडमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्याला पिकअपखाली चिरडलं

हरयाणानंतर आता झारखंडच्या रांची जिल्ह्यात वाहन तपासणी सुरू असताना एका महिला पोलीस अधिकाऱ्याला पिकअप व्हॅनखाली चिरडून तिची हत्या करण्यात आली.

Nandkumar Joshi

रांची: हरयाणानंतर आता झारखंडच्या रांची जिल्ह्यात वाहन तपासणी सुरू असताना एका महिला पोलीस अधिकाऱ्याला पिकअप व्हॅनखाली चिरडून तिची हत्या करण्यात आली. ही धडक इतकी जोरात होती की, महिला पोलीस अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर चालकानं पळ काढला. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, असा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे. (Jharkhand Ranchi female sub inspector Sandhya Topno was mowed down to death)

रांची (Ranchi) जिल्ह्यातील तुपुदाना परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी मध्यरात्री तीन वाजता पोलीस (Police) एसआय संध्या टोपनो वाहन तपासणी करत होत्या. त्याचवेळी एका महिला पोलीस अधिकाऱ्यानं पिकअप व्हॅनला थांबवण्याचा प्रयत्न केला.

वाहनचालकानं त्यानंतर पिकअपचा वेग वाढवला. पिकअप व्हॅन या पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर घातली. व्हॅनची धडक इतकी जोरदार होती की, महिला पोलीस अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपी चालक घटनास्थळावरून पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज (CCTV) पोलिसांनी तपासले. या प्रकरणात एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच ज्या वाहनाने महिला पोलीस अधिकाऱ्याला चिरडले, ते वाहन ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिला पतिव्रता दाखवण्यासाठी मोठं कुंकू अन् मंगळसूत्र घालते; माजी आमदाराची जीभ घसरली

Nashik Accident News: आनंदाचा प्रवास ठरला मृत्यूचा सापळा; नाशिकमधील 9 जणांचा मारेकरी कोण?

Pune News : पुण्यात गोळीबाराचा थरार; महिलांसह तिघांवर गुन्हा

Eating Curd At Night: उन्हाळ्यात रात्री दही खावा की नाही?

Homemade Rice Cream For Face: चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवाय? घरच्या घरी बनवा तांदळाची सोपी क्रिम

SCROLL FOR NEXT