Jharkhand UPA Saam ANI
देश विदेश

Jharkhand Politics : महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडमध्येही राजकीय भूकंप? भीतीपोटी सत्ताधारी आमदार रिसॉर्टवर

सत्ताधारी जेएमएम-काँग्रेस-आरजेडी युतीचे आमदार मंगळवारी दुपारी रांचीहून रायपूरसाठी रवाना.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

झारखंड: झारखंडमधील (Jharkhand) राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी जेएमएम-काँग्रेस-आरजेडी युतीचे आमदार मंगळवारी दुपारी रांचीहून रायपूरसाठी रवाना झाले आहेत. हे सर्व आमदार सध्या छत्तीसगडच्या राजधानीतील एका आलिशान हॉटेलमध्ये मुक्काम करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

झारखंडमध्ये देखील आता भाजप 'महाराष्ट्र पॅटर्न' राबवणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मागील काही दिवसांपुर्वी दिल्लीमधील आपच्या आमदारांना भाजपने पळविल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. 'दिल्लीतील सरकार पाडून तिथे भाजपला 'ऑपरेशन लॉटस' यशस्वी करायचं होतं,' असा आरोप देखील आम आदमी पक्षाकडून करण्यात आला होता.

अशातच आता झारखंडमध्येही सत्ताधारी गटातील आमदारांना फोडून सरकार अस्थीर होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी पक्षातील आमदारांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ -

मिळालेल्या माहितीनुसार, 'मेफेअर गोल्ड रिसॉर्ट' या हॉटेलबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, हे हॉटेल दोन दिवसांसाठी बुक करण्यात आलं आहे. या सर्व आमदारांसोबत सोरेन देखील रांची विमानतळावर पोहोचले असून सध्या सत्ताधारी गटातील ३१ आमदार रायपूरला जाणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

माध्यमांशी बोलताना सोरेन (Hemant Soren) म्हणाले, 'आम्ही कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहोत. कोणतीही अनपेक्षित घटना घडणार नाही. आम्ही सर्व गोष्टींसाठी तयार आहोत, परिस्थिती आमच्या नियंत्रणात आहे. मीही आमदारांसोबत जाणार आहे की नाही हे देखील लवकरच कळवतो.'

सोरेन यांनी रविवारी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी अविनाश पांडे यांची भेट घेऊन राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांना खाण लीज प्रकरणात सोरेन यांना आमदार म्हणून अपात्र ठरवण्याची शिफारस करणारे पत्र पाठवल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, अद्याप या प्रकरणावर कोणतीही कार्यवाही सुरू झालेली नाही.

भाजपने (BJP) काहि दिवसांपुर्वी सोरेन यांच्यावर खुंटी जिल्ह्यातील लातरातू धरणावर आमदारांसह बोटीवर सहलीला गेल्याची टीका केली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते बाबूलाल मरांडी म्हणाले की, मुख्यमंत्री सहलीचा आनंद घेण्यात व्यस्त होते, तर संपूर्ण राज्य यंत्रणा ठप्प झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT