Ranveer Singh : न्यूड फोटोशूट प्रकरण; रणवीर सिंगचा पोलीस चौकशीत मोठा खुलासा!

चौकशीदरम्यान, रणवीर सिंगने पोलिसांसमोर एक मोठा खुलासा केलाय.
Ranveer Singh news
Ranveer Singh news saam tv
Published On

Ranveer Singh Police Investigation : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगची सध्या पोलीस चौकशी सुरू आहे. न्यूड फोटोशूट प्रकरणात मुंबईतील चेम्बूर पोलीस ठाण्यात रणवीर सिंगची चौकशी सुरू आहे. अशातच आजच्या चौकशीदरम्यान, रणवीर सिंगने (Ranveer Singh) पोलिसांसमोर एक मोठा खुलासा केलाय. ते न्यूड फोटो आपण अपलोड केले नसल्याची माहिती रणवीर सिंगनं पोलीस चौकशीत दिली.

त्याचबरोबर या फोटोंमुळे इतका वाद निर्माण होईल याचीही कल्पना नसल्याची माहिती त्याने पोलिसांना (Mumbai Police) दिली. काही दिवसांपूर्वीच रणवीर सिंगने आपले न्यूज फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केले होते. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. फोटो व्हायरल होताच, अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या. (Ranveer Singh Todays News)

Ranveer Singh news
Ranveer Singh: न्यूड फोटो शूट प्रकरणी पोलिसांनी नोंदवला रणवीर सिंगचा जबाब; दोन तास चौकशी

त्यानंतर एका सामजिक संघटनेने चेंबूर पोलिसांत रणवीर सिंग याच्याविरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान, तक्रार दाखल होताच पोलिसांनी गुन्हाही दाखल केला. गुन्हा दाखल होताच, चेंबूर पोलिसांनी रणवीर सिंगला 29 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले.

पोलिसांनी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिल्यानंतर रणवीर सिंग सोमवारी (29 ऑगस्ट) सकाळी ७ वाजता चेंबूर पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याची या फोटोप्रकरणी दोन तास चौकशी केली. त्याचा जबाब नोंदवल्यानंतर ९:३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी त्याला सोडून दिलं. (Ranveer Singh Latest News)

दरम्यान, पोलिसांना दिलेल्या जबाबात रणवीर सिंगने आपण हे न्यूड फोटो अपलोड केले नसल्याची माहिती दिली. याबाबतची माहिती सूत्रांनी दिली आहे. न्यूड फोटोशूटमुळे रणवीर खूप चर्चेत होता. तर काहींनी त्याच्यावर टीका केली.

एवढेच नाही तर अभिनेत्याविरोधात अनेक तक्रारीही नोंदवण्यात आल्या होत्या. त्याच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ५०९, २९२, तसेच २९४ कलमांतर्गत तसेच आयटी अॅक्टच्या कलम ६७ ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com